तुमच्याही दाराबाहेर ‘वेलकम’ असं लिहिलेलं डोअरमॅट आहे का? तर वाढू शकतील आयुष्यातील अडचणी

आता जवळपास सर्वांच्याच दाराबाहेर 'वेलकम' लिहिलेला डोअरमॅट असतो. हा डोअरमॅट दारात ठेवणे जेवढा सकारात्मक मानला जातो तेवढाच नकारात्मकही मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार जर दरवाजा बाहेर 'वेलकम' लिहिलेला डोअरमॅट असेल तर आयुष्यातील अडचणी वाढण्याची शक्यता असते. 'वेलकम' हा शब्द चांगल्या-वाईट दोन्ही ऊर्जांना निमंत्रण देतो. त्यामुळे याबद्दलचे काही गोष्टी जाणून घेऊयात.

तुमच्याही दाराबाहेर वेलकम असं लिहिलेलं डोअरमॅट आहे का? तर वाढू शकतील आयुष्यातील अडचणी
welcome
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 19, 2025 | 10:28 AM

जवळपास प्रत्येकाच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर डोअरमॅट हे असतंच. अनेकजण घराचे प्रवेशद्वार हे आकर्षित दिसावं यासाठी डोअरमॅट ठेवतातच. त्याचसोबतच स्वच्छता राखण्यासाठी, घरातून धूळ येऊ नये यासाठी सुद्धा समोर डोअरमॅट वापरला जातो. तथापि, वास्तुशास्त्रात, ही साधी दिसणारी वस्तू उर्जेच्या प्रवाहाशी जोडली गेली आहे. त्याचा रंग आणि आकार नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतो. म्हणून, योग्य रंग आणि आकार निवडणे आवश्यक असते. त्यात अनेकांच्या दाराबाहेर ‘वेलकम’ लिहिलेला डोअरमॅटही असतो. पण वास्तूशास्त्रानुसार असा डोअरमॅट असणे अशुभ मानले जाते. त्यामागे कारणे आहेत ती काय आहेत जाणून घेऊयात.

‘वेलकम’ लिहिलेला डोअरमॅट घराबाहेर का नसवा?

वास्तुशास्त्रानुसार , मुख्य दरवाजाबाहेर ‘वेलकम’ लिहिलेला डोअरमॅट नसावा असे म्हटले जाते. कारण यामुळे सकारात्मकच नाही तर नकारात्मक उर्जाही आकर्षित होते असे म्हटले जाते. कारण ‘वेलकम’ म्हणजे स्वागत करणे. ‘स्वागत’ हा शब्द दर्शवितो की घरातील लोक इतरांचा आदर करतात. शांती, प्रेम सकारात्मकता, तसेच अनेक चांगल्या ऊर्जा यामुळे जशी आकर्षित होते त्याचप्रमाणे नकारात्मक अन् वाईट ऊर्जेच देखील एकप्रकारे स्वागतच केले जाते.

याचा अर्थ चांगल्या गोष्टींप्रमाणेच वाईट गोष्टींचे देखील घरात वेलकम होते असे मानले जाते. मुख्य दरवाजावर लिहिलेला प्रत्येक शब्द घराच्या उर्जेला निर्देशित करतो. तसेच घराबाहेरून येणारी कोणत्याही ऊर्जेला एकप्रकारे वेलकम करतो. जसं की, वास्तुनुसार, जर तुम्ही दाराच्या इथे उभे राहून नकारात्मक विचार करत असाल किंवा बोलत असाल तर “वेलकम” या शब्दाची सकारात्मकता देखील नकारात्मक परिणाम करू शकते. कारण मुख्य दरवाजाची ऊर्जा अत्यंत संवेदनशील असते. म्हणून, दारावर उभे राहून कधीही वाद, तणाव किंवा तक्रार करू नका. नेहमी शांतपणे, सकारात्मक आणि सकारात्मक बोला. अन्यथा तीच ऊर्जा घरातही प्रवेश करते.

रंग आणि आकार कोणता असावा?

वास्तुनुसार, तपकिरी रंग हा डोअरमॅटसाठी सर्वोत्तम रंग मानला जातो. तो पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करतो आणि नकारात्मकता कमी करतो. हिरवा रंग डोअरमॅटसाठी सर्वात शुभ रंग मानला जातो. हा रंग ताजेपणा, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हा रंग घरात निरोगी ऊर्जा आणतो. निळा डोअरमॅट देखील चांगला आहे कारण हा रंग शांती, सौभाग्य आणि संतुलन दर्शवतो.

जर तुमचा दरवाजा उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे असेल तर पिवळ्या रंगाचा डोअरमॅट वापरा. ​​यामुळे घरात सकारात्मक विचारांना चालना मिळते. तर, दक्षिण किंवा पूर्वेकडे तोंड असलेल्या दारांसाठी काळा डोअरमॅट शुभ असतो. तो लावताना काही काळजी घेणे महत्वाचे आहे. काळा रंग हा नकारात्मक रंग मानला जातो, म्हणून स्वागत किंवा इतर शुभ चिन्ह त्यावर असेल असा काळ्या रंगाचा डोअरमॅट ठेवणं शक्यतो टाळा.

आकार किती असावा?

आयताकृती डोअरमॅट सर्वात शुभ मानला जातो. गोल डोअरमॅट फक्त मोठ्या दारांसमोरच शुभ मानला जातात. कोयर म्हणजे नारळाच्या केसांपासून बनवलेला डोअरमॅट नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. ज्यूट किंवा कापडी डोअरमॅट देखील चांगले मानले जातात. रबर डोअरमॅट कधीही दारात ठेवू नयेत. ते ऊर्जा रोखतात आणि दारावर नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)