Vastu Shastra : घरात कासवाची मूर्ती ठेवण्याचे आहेत फायदेच फायदे, जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट मूर्ती आणि झाडं घरात ठेवणं हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे, या मूर्तींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो आणि घराला आर्थिक स्थैर्य लाभते.

जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात, जसं की घरात काही कारण नसताना भांडण होतं. कितीही पैसा कमवला तरी तो हातात न टिकणं, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आरोग्याची समस्या, तर वास्तुदोष दूर कसा करायचा? याबद्दल वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांच्या मदतीने आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो. घरातील वस्तुदोष दूर झाल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. आर्थिक स्थैर्य लाभतं. वास्तुशास्त्रानसुार अशा काही मूर्ती आणि झाडं आहेत, ते जर तुमच्या घरात असतील तर त्याचा उपयोग हा घरातील वास्तुदोष दूर होण्यास होतो. घरात कासवाची मूर्ती ठेवणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे, आज आपण कासवाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे काय -काय फायदे होतात, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
सकारात्मक ऊर्जा – घरात कासवाची मूर्ती ठेवणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. जर तुमच्या घरात कासवाची मूर्ती असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरातील वास्तुदोष कमी होतो. घरात सुख, शांती राहते. विनाकारण वाद विवाद होत नाहीत, आर्थिक स्थैर्य लाभते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
धनाचे प्रतिक – कासवाला धनाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. ज्या घरात कासवाची मूर्ती आहे, त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, जर तुमच्यावर कर्ज वाढलं असेल, हातात आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवू शकता, त्यामुळे तुमच्या या समस्या दूर होतील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
मुर्ती कोणत्या दिशेला ठेवावी – जर तुमच्या घरात कासवाची मूर्ती असेल तर ती पश्चिम -दक्षिण दिशेला किंवा उत्तरेला ठेवावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. घरात कासवाची मूर्ती असेल तर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम हा तुमच्यावर होत असतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
