मंदिराबाहेर चप्पल काढताना तुम्हीही ही करताय या चूका? घडेल पाप

मंदिरात गेल्यावर आपण बाहेर चप्पल काढतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की यामध्ये देखील काही नियम असतात. तसेच चप्पल काढताना नकळत आपल्याकडून काही चुका होतात ज्यामुळे ते पाप मानलं जातं, त्यामुळे मंदिरात जाताना चप्पल काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात .

मंदिराबाहेर चप्पल काढताना तुम्हीही ही करताय या चूका? घडेल पाप
Do you also make this mistake when taking off your slippers outside the temple
Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Aug 26, 2025 | 4:15 PM

हिंदू संस्कृतीत मंदिर हे एक दैवी ऊर्जा असलेलं धार्मिक स्थळ मानलं जातं. मंदिरात जाताना आपण देवासाठी फुले, हार, फळं, मिठाई किंवा कधीकधी पूर्ण पुजेची थाळी घेऊन जातो. तसेच मंदिरात गेल्यावर मनाला शांती मिळते. शुद्ध, पवित्र वातावरण मनाला भावतं. शरीर, मन आणि आत्मा पूर्ण शुद्धतेने प्रवेश केला पाहिजे. तसेच चप्पल आणि बूट हे चिखल, धूळ आणि अशुद्धतेचे प्रतीक आहेत त्यांना मंदिराच्या आत नेणे किंवा मंदिराच्या मुख्यद्वारापुढे काढणे अशुभ मानले जातात.

मंदिराबाहेर चप्पल आणि बूट काढताना या गोष्टींची काळजी घ्या 

परंतू कधीकधी नकळत, मंदिराबाहेर चप्पल काढताना आपल्याकडून अशा काही चुका होतात. ज्यामुळे हळूहळू पुण्य कमी होऊ लागते आणि पापांची संख्या वाढू लागते. तसेच, धर्माच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य मानले जाते. मंदिराबाहेर चप्पल आणि बूट काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात. अन्यथा त्या घटना पाप मानल्या जातात.

मंदिराच्या मुख्य दारासमोरच चप्पल काढणे

मंदिराच्या मुख्य दारासमोरच चप्पल काढणे पाप मानले जाते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होते. पायऱ्यांवर चप्पल ठेवल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो आणि त्यामुळे पवित्र स्थानाची ऊर्जा आणि सकारात्मकता कमी होते. शास्त्रांमध्ये हा अनादर मानला जातो. मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग स्वच्छ आणि अडथळारहित असावा, हा धार्मिक शिष्टाचार आहे.

मंदिराबाहेर बूट आणि चप्पल अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी ओलांडू शकणार नाही

बरेच लोक मंदिराच्या दाराशीच चप्पल काढून देवाचे दर्शन घेण्यासाठी जातात. किंवा चप्पलचा ढीग लागलेला असतो. हे पूर्णपणे अयोग्य आहे. असं म्हटलं जातं की, जिथे तुम्ही चप्पल काढली आहे तिथे त्या चप्पल ओलांडणाऱ्या सर्व लोकांचे सर्व दुःख आणि पाप तुमच्या नशिबात जमा होतात. म्हणून, तुमचे बूट आणि चप्पल अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणीही त्यांना ओलांडू शकणार नाही.

दुसऱ्याच्या चप्पलवर चुकूनही चप्पल काढू नका.

दुसऱ्याच्या चप्पलवर बूट किंवा चप्पल काढू नये. धार्मिक श्रद्धेनुसार, एखाद्याच्या बूट किंवा चप्पलवर पाय ठेवून उभे राहणे किंवा दुसऱ्यांच्या चपलीवर आपण आपली चप्पल किंवा बूट काढू नये. हे इतरांच्या उर्जेमध्ये आणि नशिबात हस्तक्षेप मानलं जातं. विशेषतः जर एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या किंवा पंडिताच्या चप्पलवर पाय पडला तर ते अनादर मानला जातो. तसेच चप्पल कधीही पालथी ठेवू नका.

शास्त्रांनुसार, चप्पल काढण्याची योग्य पद्धत

जर मंदिराच्या इथे जागा असेल तर बसा किंवा खाली वाकून चप्पल हातांनी व्यवस्थित करा.

मंदिरासमोर किंवा दाराजवळ चुकूनही चप्पल काढू नका

दुसऱ्याची चप्पल पायाने लाथाडू नका किंवा उडवू नका नीट बाजूला करा

तुमचा चप्पल कधीही पालथी ठेवू नका सरळ ठेवा

मंदिराच्या परिसरात स्टँड असल्यास चप्पल तिथेच ठेवा, मुख्य प्रवेशद्वारावर किंवा पायऱ्यांवर अजिबात ठेवू नका

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )