हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या खास वस्तू, आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही

उद्या सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. तुम्ही या सर्व गोष्टी दान करण्यासोबतच या दिवशी उपवास आणि प्रर्थना देखील करू शकता.  

हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या खास वस्तू, आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही
| Updated on: Apr 11, 2025 | 10:16 PM

संकटमोचक देवता हनुमान यांची जयंती दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात आणि श्रद्धेनं सर्वत्र साजरी केली जाते. या वर्षी शनिवारी बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीनिमित्त देशभरातली हनुमान मंदिरांना सुंदर फुलांची आरास करण्यात येते. या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेनं उपवास करतात, हनुमानाची पूजा करतात, प्रार्थना करतात. भजन, किर्तन यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. भक्त आपली इच्छा देवापुढे व्यक्त करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हनुमान जयंतीच्या दिवशी आपण अशा काही गोष्टी दान करू शकतो, ज्यामुळे तुमच्यावर सदैव हनुमानांची कृपा राहील.तुमच्या आयुष्यात सुख, शांती, स्थौर्य आणि समृद्धी येईल. जाणून घेऊयात हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात त्याबद्दल.

हळदीचं दान

हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हळद दान केली तर तुमच्या घरात धन धान्य संपदा राहाते. हळीच्या दानाकडे आर्थिक समृद्धीचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं.

धान्याचं दान

हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर गरजू व्यक्तीला धान्याचं दान केलं तर तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

लाडवाचं दान

असं म्हणतात की हनुमानजीला लाडू हे अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही जर हनुमान जंयतीच्या दिवशी लाडवाचं दान केलं तर तुम्हाला आर्थिक स्थिरता येते, तुमच्या करिअरमधील अडणी दूर होतात.

फुटाने आणि गुळाचं दान

हनुमानजीला फुटाने आणि गूळ हे अत्यंत प्रिय आहे, असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही जर हनुमान जयंतीच्या दिवशी फुटाने आणि लाडूचं दान केलं तर तुमच्या घरात आर्थिक समृद्धी येते. सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात.

उद्या सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे. तुम्ही या सर्व गोष्टी दान करण्यासोबतच या दिवशी उपवास आणि प्रार्थना देखील करू शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)