AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eid al-Adha 2021 | आज बकरी ईद , जाणून घ्या याची कहाणी आणि महत्त्व

इस्लाम धर्मातील त्यागाचा पवित्र भावनेचा उत्सव बकरी ईद 2021 (Bakrid 2021) आज साजरा केला जात आहे. बकरी ईद किंवा ईद-उल-जुहा (Eid ul adha 2021) चा सण मुस्लिम समाजासाठी विशेष महत्त्वाचा असतो. हा उत्सव कुर्बानीशी संबंधित आहे. कुर्बानीचा खरा अर्थ एक असे बलिदान जे इतरांसाठी करण्यात येते.

Eid al-Adha 2021 | आज बकरी ईद , जाणून घ्या याची कहाणी आणि महत्त्व
bakrid 2021
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 20, 2021 | 1:08 PM
Share

मुंबई : इस्लाम धर्मातील त्यागाचा पवित्र भावनेचा उत्सव बकरी ईद 2021 (Bakrid 2021) आज साजरा केला जात आहे. बकरी ईद किंवा ईद-उल-जुहा (Eid ul adha 2021) चा सण मुस्लिम समाजासाठी विशेष महत्त्वाचा असतो. हा उत्सव कुर्बानीशी संबंधित आहे. कुर्बानीचा खरा अर्थ एक असे बलिदान जे इतरांसाठी करण्यात येते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर अंदाजे 70 दिवसानंतर बकरी ईद साजरी केली जाते. चला बकरी ईदच्या सणाशी संबंधित कुर्बानीची कहाणी जाणून घेऊया (Eid al-Adha 2021 Know The Story Of Kurbani Ani Importance Of This Day In Islam)-

बकरी ईद का साजरी केली जाते?

बकरी ईदच्या या दिवशी खुदासाठी बकरीचा बळी दिला जातो. असे मानले जाते की बकरी ईदचा उत्सवाची सुरुवात हजरत इब्राहिमपासून सुरु झाला, जे अल्लाहचे पैगंबर होते. मान्यता आहे की एकदा फरिश्तांच्या सांगण्यावरुन अल्लाहने हजरत इब्राहिमची परीक्षा घेतली. यापूर्वी हजरत इब्राहिमच्या जागी मोठ्या दुआनंतर मुलाचा जन्म घेतला होता. एकदा हजरत इब्राहिमला स्वप्नात हुक्म मिळाला की त्याने स्वत:ला अल्लाहच्या मार्गात त्याग-कुर्बान करावे. त्याने ते कर्तव्य पार पाडले. दुसऱ्या रात्रीही त्याला हेच स्वप्न पडले, म्हणून त्याने सकाळी होताच त्याचे कर्म केले.

अल्लासाठी कुर्बानी दिली

तिसर्‍या रात्री हजरत इब्राहिमला हुक्म मिळाला की त्याने आपल्या सर्वात प्रिय वस्तुला अल्लाहच्या मार्गात कुर्बान करावे. एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम असते. हजरत इब्राहिमने आपल्या कर्तव्याचं निर्वहन करत आपला मुलगा इस्माईलची कुर्बानी देण्यास तयार झाले. यानंतर, जेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि आपल्या मुलगा इस्माईलची कुर्बानी देण्यासाठी चाकू उचलला त्याचवेळी फरिश्तांचा प्रमुख जिब्रील अमीन यांनी इस्माईलला हटवून त्याठिकाणी ठेवले. अशाप्रकारे इस्लाम धर्मात हजरत इब्राहीम यांच्याद्वारे पहिली कुर्बानी देण्यात आली.

बकरी ईद कशी साजरी केली जाते

हजरत इब्राहीमच्या काळापासून ते आजतागायत हा कुर्बानीचा सण ईद-उल-जुहा (Eid ul adha 2021) म्हणून जगभर साजरा केला जातो. दरवर्षी साजरा होणार्‍या बकरी ईद सणाच्या निमित्ताने, ज्या बकरीची कुर्बानी दिली जाते त्याच्या मांसला तीन भागात विभागले जाते. त्यातील एक भाग गरिबांसाठी, दुसरा भाग मित्र आणि नातेवाईकांसाठी आणि तिसरा भाग आपल्या कुटुंबासाठी ठेवला जातो. बकरी ईदचा सण आपल्याला त्याग आणि बलिदानाबद्दल शिकवते.

Eid al-Adha 2021 Know The Story Of Kurbani Ani Importance Of This Day In Islam

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

बकरी ईदला नमाज पढण्यासाठी 50 जणांना परवानगी द्या; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bakrid 2021 Guidelines Maharashtra : ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ