सतत अपयश येतंय! आचार्य चाणक्य म्हणतात, ‘या’ 6 प्रश्नांची उत्तरं नक्की शोधा?

आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी अशा सांगितल्या आहेत, ज्या आपल्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. अनेकांचं असं होतं की, मेहनत केली तरी, यश मिळत नाही. अशा लोकांना चाणक्य सांगतात, 'या' 6 प्रश्नांची उत्तरं नक्की शोधा?

सतत अपयश येतंय! आचार्य चाणक्य म्हणतात, या 6 प्रश्नांची उत्तरं नक्की शोधा?
Chanakya Niti
| Updated on: Sep 09, 2026 | 9:57 AM

आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये कुटुंबियांसोबत कसं राहाचयं, मित्रांसोबत कसं राहायचं, एवढंच नाही ऑफिसमध्ये कशी वागणूक असली पाहिजे… याबद्दल देखील त्यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रचंड मेहनत करुन देखील अनेकांना यश मिळत नाही. सतत अपयशाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी देखील चाणक्य यांनी चांगला सल्ला दिला आहे… सतत अपयश वाट्याला येत असेल तर, चाणक्य यांनी 6 प्रश्नांची उत्तरं शोधण्यास सांगितलं आहे, तर जाणून घ्या कोणती आहेत ती सहा प्रश्न…

आचार्य चाणक्य म्हणतात की, असे काही लोक आहेत जे कठोर परिश्रम करूनही यश मिळवू शकत नाहीत. चाणक्य नीती सांगते की, अशा लोकांनी आपली ध्येये आणि सद्यस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर, क्षमतेचे अचूक मोजमाप करणे आवश्यक आहे… असं देखील चाणक्य म्हणतात.

चाणक्य म्हणतात, आयुष्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी किंवा ध्येय निश्चित करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने स्वतःला 6 महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत. पहिला प्रश्न म्हणजे, निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे का? जेव्हा एखादी व्यक्ती आपलं ध्येय साध्य करण्यासाठी निघते, तेव्हा तिने विचार केला पाहिजे की सध्याची वेळ तिच्यासाठी अनुकूल आहे का? यावेळेत सर्वकाही योग्य होईल का… सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.

परिस्थिती प्रतिकूल असल्यास, थोडा संयम आणि खबरदारी घेणं आवश्यक आहे. चुकीच्या वेळी घेतलेले निर्णय उलट परिणाम करू शकतात. स्वतःला विचारा, माझे खरे मित्र कोण आहेत? तुमच्या सुख-दुःखात तुमच्या पाठीशी कोण उभे राहतात आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कोण तुमच अनुसरण करतात, हे तुम्हाला ओळखण आवश्यक आहे.

कामाचं वातावरण किंवा ठिकाण योग्य आहे का? हेदेखील तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. जिथे उदरनिर्वाहाचा मार्ग नाही, सुरक्षितता नाही, किंवा जिथे कामाला योग्य तो आदर मिळत नाही, अशा ठिकाणी काम करणं चांगलं नाही. त्याचप्रमाणे, तुमच्या उत्पन्नाचं स्रोत कोणतं आहेत आणि तुमचा खर्च कुठे होतो, याचा तुम्ही अचूक हिशोब ठेवला पाहिजे.

मी खरोखर कोण आहे हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. तुमचे बळ आणि कमकुवतपणा काय आहेत, यावरून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमची खरी क्षमता शोधून काढली पाहिजे. कोणतंही मोठे ध्येय गाठण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आंतरिक क्षमतेचं अचूक मोजमाप करणं आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us