Feng Shui : घरात माशांच्या जोडीची मूर्ती ठेवा, काही दिवसांमध्येच घडेल मोठा चमत्कार, आहेत फायदेच फायदे

फेंगशुई आणि वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करतात, त्यामुळे घरात सुख शांती येते, अशाच एका उपयाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Feng Shui :  घरात माशांच्या जोडीची मूर्ती ठेवा, काही दिवसांमध्येच घडेल मोठा चमत्कार, आहेत फायदेच फायदे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 5:43 PM

फेंगशुई अनुसार घरात माशांच्या जोडीची मूर्ती किंवा भिंतीवर माशांच्या जोडीची प्रतिमा लावल्याने अनेक प्रकारचे लाभ मिळतात, तुम्ही तुमच्या घरात पितळ किंवा चांदीपासून तयार केलेली दोन माशांची मूर्ती ठेवू शकता, फेंगशुईसोबतच वास्तुशास्त्रात देखील घरामध्ये माशांच्या जोडीची प्रतिमा किंवा मूर्ती असावी असं सांगण्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही अशा मूर्ती तुमच्या घरामध्ये ठेवतात, तेव्हा घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात शांती राहाते, तुमची प्रगती होते. अकस्मात येणारी संकटं दूर होतात. प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतात. वास्तुशास्त्रानुसार माशांना उत्तम आरोग्य, शांतता, सुख, समृद्धी, धन आणि शक्तीचं प्रतिक मानण्यात आलं आहे.

नोकरीमध्ये प्रगतीची संधी

तुम्ही व्यवसाय करत आहात किंवा नोकरी करत आहात, जर तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती करायची असेल, व्यवसायामध्ये चांगला लाभ व्हावा वाटत असेल तर घरात माशांच्या जोडीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा असा सल्ला फेंगशुई आणि वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, मात्र अशा प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा घरात ठेवताना एक गोष्टी लक्षात असू द्या की, तुम्ही तुमच्या घरात जी माशांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवणार आहात ती नेहमी जोडीनेच पाहिजे.

दिशा कोणती असावी?

पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेला तुम्ही ही माशांच्या जोडीची मूर्ती ठेवू शकतात, यासाठी ईशान्य दिशा देखील शुभ मानली जाते. ईशान्य दिशेच्या कोपऱ्याला जर तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर माशांच्या जोडीची प्रतिमा लावली तर तुमच्या घराचा भाग्योदय होतो. घरात सुख शांती येते, घरातील वास्तुदोष दूर होतात. तुम्ही माशांच्या जोडीची मूर्ती तुमच्या ऑफीस किंवा दुकानात देखील लावू शकतात, त्यामुळे तुम्हाला प्रगतीच्या नव नवीन संधी प्राप्त होतात, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.

फेंगशुईमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की जर तुम्ही माशांच्या जोडीची प्रतिमा किंवा मूर्ती तुमच्या घरात ठेवली तर तुमच्या मागचे सर्व संकट दूर होतात. आरोग्याच्या समस्या नाहीसा होतात, प्रगतीच्या नव्या संधी मिळतात, नोकरी आणि व्यावसायात देखील मोठा फायदा होता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)