आधी मैत्री त्यानंतर प्रेम…! स्त्री – पुरुषांच्या नात्याबद्दल काय सांगतात आचार्य चाणक्य? जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट

आचार्य चाणक्या यांच्या चाणत्या नीतिमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. नाते - संबंधांबद्दल देखील चाणक्या यांनी सांगितलं आहे... एवढंच नाही तर, स्त्री आणि पुरुषाच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल देखील चाणक्य यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे... तर जाणून घ्या आचार्य चाणक्य यांनी काय सांगितलं आहे...

आधी मैत्री त्यानंतर प्रेम...! स्त्री - पुरुषांच्या नात्याबद्दल काय सांगतात आचार्य चाणक्य? जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
| Updated on: Jul 04, 2026 | 2:35 PM

मुली – मुली कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत… असं म्हणतात, तर स्त्री आणि पुरुष यांचं नातं मैत्रीपर्यंत कधीच राहू शकत नाही. असं देखील बोललं जातं. तर मुलं चांगली मैत्री निभावतात, असं देखील म्हणतात. हा एक वाद समाजात युगानुयुगे चालत आलेला आहे. अनेक लोकांनी आपली मते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली आहेत. प्रसिद्ध तत्त्वज्ञ आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘चाणक्य नीती’मध्ये मैत्री आणि स्त्री-पुरुष संबंधांचा उल्लेख केला आहे. तर जाणून घ्या स्त्री-पुरुषांमधील आकर्षण आणि मैत्रीबद्दल चाणक्य काय सत्य सांगतात.

चाणक्याच्या मते, निसर्गाच्या नियमांनुसार स्त्री-पुरुषांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण असते. मुलगा आणि मुलगी त्यांच्या वयात कितीही निखळ मित्र असले तरी, ते सतत भेटतमुळे आणि बराच वेळ एकत्र घालवत असल्यामुळे, कालांतराने त्या मैत्रीचे आकर्षणात किंवा प्रेमात रूपांतर होण्याची दाट शक्यता असते. मानवी मनानुसार, प्रत्येकजण या आकर्षणावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही.

जेव्हा दोन मित्रांपैकी एक जण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा करिअरमध्ये गंभीर समस्येतून किंवा नैराश्यातून जात असतो, तेव्हा जवळच्या मित्राकडून मिळणारा भावनिक आधार आणि दिलासा त्यांच्यातील सीमारेषा बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यावेळी मिळणारी काळजी भावनिक जवळीकीत बदलू शकते.

चाणक्य सामाजिक परिस्थितीबद्दलही बोलतात. दोन व्यक्तींना आपण फक्त मित्र आहोत असं कितीही वाटत असलं तरी, त्यांच्या सभोवतालचा समाज आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या नात्याकडे नेहमीच संशयाने पाहतात. ही परिस्थिती अनेकांनी अनुभवली देखील असेल. इतरांनी वारंवार विचारलेल्या प्रश्नांमुळे आणि बोललेल्या शब्दांमुळे, नकळतपणे दोघांच्याही मनात प्रेम किंवा लग्नाची कल्पना रुजू शकते. ही समस्या अनेक स्त्री-पुरुष मैत्रींमध्ये सामान्य आहे. वरवर पाहता दोघे जिवलग मित्र वाटत असले तरी, त्यांच्यापैकी एकाला एकमेकांबद्दल तीव्र रोमँटिक किंवा लैंगिक आकर्षण असण्याची शक्यता असते.

स्त्री-पुरुष मैत्री शक्य आहे का?

चाणक्याच्या मते, एक पुरुष आणि एक स्त्री चांगले मित्र असू शकतात, परंतु त्यासाठी दोघांमध्ये उच्च पातळीची मानसिक परिपक्वता, परस्पर आदर आणि नात्याच्या मर्यादा न ओलांडण्याची काळजी असणे आवश्यक आहे. मैत्रीमागे एक स्पष्ट ध्येय आणि पारदर्शकता असली पाहिजे. एकमेकांना प्रगती करण्यास मदत करणारी मैत्री नेहमीच सर्वोत्तम असते.

पण चाणक्य म्हणतात असा एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला देखील देतात. चाणक्य म्हणतात तुम्ही तुमची अत्यंत खाजगी गुपिते कोणालाही, अगदी जवळच्या मित्रालाही सांगू नयेत. परिस्थिती बदलल्यावर मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होऊ शकते आणि ती गुपितेच तुमच्या अधःपतनाचे कारण ठरू शकतात.

Follow Us