AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | ही पाच झाडं चुकूनही घराच्या अंगणात लावू नये, जाणून घ्या यामागील कारण काय?

वास्तुशास्त्राच्या मते, रोपं आणि झाडे देखील घराच्या सुख-समृद्धीशी (Vastu Tips) संबंधित असतात. जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात, जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बर्‍याच अडचणींना कारणीभूत ठरतात.

Vastu Tips | ही पाच झाडं चुकूनही घराच्या अंगणात लावू नये, जाणून घ्या यामागील कारण काय?
Planting Trees
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 28, 2021 | 11:36 AM
Share

मुंबई : वास्तुशास्त्राच्या मते, रोपं आणि झाडे देखील घराच्या सुख-समृद्धीशी (Vastu Tips) संबंधित असतात. जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात, जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बर्‍याच अडचणींना कारणीभूत ठरतात. वास्तुमध्ये अंगणात किंवा घराभोवती काही रोपे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्या (Five Plants That Should Not Be Planted In The Courtyard Of The House According To Vastu Tips) –

1. काटे असलेलं कोणतीही झाडे घराच्या अंगणात लावू नये. काटेरी झाडे घरात नकारात्मकता आणतात आणि बर्‍याच समस्या निर्माण करतात. मान्यता आहे की अशा रोपांची लागवड केल्यास घरातील त्रास आणि आर्थिक संकटं वाढतात. पण, गुलाबाचं झाड याला अपवाद आहे.

2. घरात कुणी चिंचेचे झाड लावू नये. मान्यता आहे की चिंचेची लागवड केल्याने घरात रोग घर करतात. याशिवाय, परस्पर संबंध खराब होतात. यामुळे घराचे वातावरण खराब होते. त्याच वेळी, नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

3. पिंपळाचे झाड अतिशय शुभ मानले जात असले तरी त्याची पूजा देखील केली जाते. परंतु त्याची रोपे कधीही घराच्या आत किंवा दाराच्या आसपास लावू नये. मान्यता आहे की, यामुळे पैशांचे नुकसान होते. याचे वैज्ञानिक कारण म्हणजे पिंपळाची मुळे दूरदूरपर्यंत पसरतात, ज्यामुळे ते घराच्या भिंतींना नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच, जर आपल्या घरात पिंपळाचे झाड असेल तर ते मंदिराच्या जवळ किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी लावावे.

4. बरेच लोक घरात मदारची लागवड करतात. परंतु, वास्तुनुसार ते चांगले मानले जात नाही. मान्यता आहे की, मदारसह अशी झाडे ज्यामधून दूध निघते ते घरात लावू नये. यामुळे नकारात्मकता येते.

5. खजुरचे झाड नक्कीच घराचे सौंदर्य वाढवते, परंतु ते लावणे टाळले पाहिजे. वास्तुच्या म्हणण्यानुसार हे लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते आणि कुटुंबात आर्थिक संकटं वाढतात.

Five Plants That Should Not Be Planted In The Courtyard Of The House According To Vastu Tips

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर

Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल

Vastu Tips | जर अति राग येत असेल, तर घरात वास्तुनुसार हे बदल करा…

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?