Vastu Tips | घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा सुख-समृद्धीपासून नेहमी राहाल वंचित

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) काही गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता आणतात. सकारात्मकतेचा आपल्या विचारांवरही परिणाम होतो.

Vastu Tips | घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा सुख-समृद्धीपासून नेहमी राहाल वंचित
Vastu Tips

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) काही गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता आणतात. सकारात्मकतेचा आपल्या विचारांवरही परिणाम होतो. कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्यात त्याबाबत पूर्ण आत्मविश्वास असतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते. परंतु घरात सर्व काही असूनही निराशा असेल. तर याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवरही दिसून येतो. यामुळे कठोर परिश्रम करुनही यश मिळत नाही (Vastu Tips Do Not Kept These Things At Home Brings Bad Luck).

वास्तुशास्त्रानुसार याचे कारण वास्तु दोष असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या निरुपयोगी गोष्टी नकारात्मक उर्जा वाढविण्याचे काम करतात. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या घरात ठेवू नयेत –

खंडित मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार घरात खंडित मूर्ती ठेवणे अशुभ आहे. या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. या गोष्टी केवळ वास्तुशास्त्रातच नव्हे तर ज्योतिषशास्त्रातही ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी घरात ठेवल्यास दुर्दैव येतं आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

घर स्वच्छ ठेवा

आपल्यापैकी बर्‍याचजणांना हे माहित आहे की जिथे स्वच्छता नसते तिथे देवी लक्ष्मी निवास करत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता न ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

संध्याकाळी घरात प्रकाश असाला

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा परिणाम होतो. म्हणून, यावेळी घराच्या प्रत्येक भागात प्रकाश असणे आवश्यक आहे. प्रकाश असल्यास सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो.

निरुपयोगी औषधे ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये. असे मानले जाते की, घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी.

याप्रकारचे फोटो

घरात जहाजे बुडणे, युद्धाचे चित्र असे फोटो ठेवल्याने नकारात्मक विचार वाढतात, ज्यामुळे मनामध्ये तणाव आणि निराशा निर्माण होते. म्हणून या गोष्टींपासून दूर राहायला हवं.

Vastu Tips Do Not Kept These Things At Home Brings Bad Luck

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | आजारांना घरापासून दूर ठेवायचं असेल तर घरात ‘हे’ उपाय करा

Vastu Tips Health | सततचं आजारपण दूर करायचं असेल, तर या टिप्स ट्राय करा, समस्या होईल दूर