Vastu Tips Health | सततचं आजारपण दूर करायचं असेल, तर या टिप्स ट्राय करा, समस्या होईल दूर

Vastu Tips Health | सततचं आजारपण दूर करायचं असेल, तर या टिप्स ट्राय करा, समस्या होईल दूर
Vastu-Tips

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि (Vastu Tips For Good Health) नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो. बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात.

Nupur Chilkulwar

|

Apr 29, 2021 | 3:01 PM

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि (Vastu Tips For Good Health) नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या जीवनावर परिणाम होतो. बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात. अशा परिस्थितीत आपण किंवा घरातील सदस्य सतत आजारी राहत असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष आहे. घरातील वास्तुू दोष कुटुंबातील सदस्यांवर परिणाम करतात (Try These Vastu Tips For Your And Your Family Members Good Health).

आज आम्ही तुम्हाला अशा वास्तू दोषांबद्दल सांगत आहोत ज्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच, त्यावरील उपायांबद्दल जाणून घ्या. असे केल्याने तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल.

🔷 जर आपल्या घरासमोर एखादा खड्डा असेल तर यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास आणि तणावाची समस्या निर्माण होते. तो खड्डा भरा आणि घरासमोर घाण नसल्याचे सुनिश्चित करा.

🔶 तुम्ही जेव्हाही जेवण कराल तेव्हा लक्षात घ्या की आपला चेहरा उत्तर किंवा पूर्वेकडील दिशेने असावा. असे केल्याने आपल्याला पोटाचे त्रास होणार नाही. तसेच, आपलं पचन देखील चांगले होईल.

🔷 जर आपल्या घरासमोर एखादे मोठे झाड किंवा खांब असेल आणि त्याची सावली घरात पडत असेल तर हा वास्तू दोष दूर करण्यासाठी घराबाहेर दोन्ही बाजूंनी स्वस्तिकचं चिन्ह काढा.

🔶 वास्तुनुसार घराच्या शयनकक्षात जुन्या वस्तू गोळा करु नयेत. असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक उर्जा प्रसारित होते. ज्यामुळे विषाणूजन्य रोग होऊ शकतात. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

🔷 बेडरुम पूर्णपणे बंद करु नये. असे झाल्यास नकारात्मक उर्जेचा प्रभाव होतो. बेडरुमच्या समोर कधीही आरसा असू नये. ज्यांना मानसिक त्रास होत आहे, त्यांनी बीमपासून दूर राहावे. त्याशिवाय, शयनगृहात कधीही देवाची कोणतीही मूर्ती किंवा चित्र ठेवू नका.

🔶 घराच्या दक्षिण कोपऱ्यात दररोज लाल रंगाचे बल्ब आणि मेणबत्त्या पेटविणे आवश्यक आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहिल.

Try These Vastu Tips For Your And Your Family Members Good Health

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील

Vastu Tips | करिअरमध्ये यश हवं असेल, तर ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल…

Vastu Tips | घरात याप्रकारे करा ‘मोर’ पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें