Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल

धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर वास्तुशास्त्रातही गंगा जलचं विशेष महत्त्व आहे. गंगा जल फक्त शुध्दीकरणातच नव्हे तर इतर समस्यांपासून सुटका करण्यासही मदत करते. (Vastu Tips Use Ganga Jal For Happiness And Wealth)

Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 2:50 PM

मुंबई : हिंदू धर्मात गंगा जल हे अत्यंत पवित्र मानले जाते (Vastu Tips). आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गंगा जल बरेच वर्ष घरात ठेवले तरी ते खराब होत नाही. कोणत्याही गोष्टीवर गंगा जलचे काही थेंब शिंपडले तर ते शुद्ध होते. मान्यता आहे की गंगेच्या पाण्यात अंघोळ केल्यास तुमची सर्व पापं दूर होतात. केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर वास्तुशास्त्रातही गंगा जलचं विशेष महत्त्व आहे. गंगा जल फक्त शुध्दीकरणातच नव्हे तर इतर समस्यांपासून सुटका करण्यासही मदत करते. (Vastu Tips Use Ganga Jal For Happiness And Wealth)

गंगा जलचा वापर यज्ञ, पाठ, होम-हवन, मंत्र अशा प्रकारच्या कार्यात केले जातात. मान्यता आहे की कोणत्याही विशेष पूजेमध्ये गंगा जलचा वापर केल्यास शुभ परिणाम होतात. त्याशिवाय, पूजा करणे अपूर्ण मानले जाते. याचं सेवन केल्याने रोग बरे होतात. याशिवाय, शास्त्रात गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही विशिष्ट मुहूर्तावर आणि नक्षत्रात गंगा स्नान करणे खूप फलदायी ठरते. गंगा जल कशाप्रकारे वास्तू दोशापासून मुक्त होण्यास मदत करते ते जाणून घ्या –

नकारात्मक उर्जा नष्ट करते

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घराच्या कोणत्याही भागात नकारात्मक उर्जा वास करत असल्याचं वाटत असेल, तर पूजेनंतर त्या भागात गंगा जल शिंपडावे. यामुळे घरात शुभता येईल. तसेच मनही शांत राहील.

ग्रह दोषांपासून मुक्तता मिळेल

जर एखादी व्यक्ती ग्रहदोषच्या समस्येने त्रस्त असेल तर ती सोमवारी आणि शनिवारी विशेष उपाय करु शकते. सोमवारच्या दिवशी भगवान महादेवाच्या पूजेवेळी गंगा जल अर्पण करावे. याशिवाय, शनिवारी पाण्यात थोडं गंगा जल मिसळून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.

कर्जातून मुक्तता मिळेल

वास्तुशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती कर्जामुळे त्रस्त असेल, तर त्यांनी गंगा जल घरात ठेवावे. गंगा जल ईशान्य दिशेने पितळीच्या भांड्यात ठेवले पाहिजे. असे केल्याने कर्जाची समस्या हळूहळू कमी होते.

मुलांचं मन अभ्यासात लागेल

मुलांचं अभ्यासात मन रमावं यासाठी बुधवारी श्रीगणेशाची पूजा करावी आणि घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात गंगा जल शिंपडावे. रात्री झोपताना मुले अचानक घाबरत असतील तर त्यांच्या पलंगावर गंगा जल शिंपडावं (Vastu Tips Use Ganga Jal For Happiness And Wealth).

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganga Saptami 2021 | कळत-नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गंगा सप्तमीला हे उपाय करा

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.