AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganga Saptami 2021 | कळत-नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गंगा सप्तमीला हे उपाय करा

दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी (Ganga Saptami 2021) असते. मान्यता आहे की या दिवशी, देवी गंगेचा जन्म झाला आणि त्या स्वर्गातून भगवान शंकराच्या जटांमध्ये विराजमान झाल्या.

Ganga Saptami 2021 | कळत-नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गंगा सप्तमीला हे उपाय करा
Ganga Snan
| Updated on: May 18, 2021 | 11:26 AM
Share

मुंबई : दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी (Ganga Saptami 2021) असते. मान्यता आहे की या दिवशी, देवी गंगेचा जन्म झाला आणि त्या स्वर्गातून भगवान शंकराच्या जटांमध्ये विराजमान झाल्या. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी हा भगवान चित्रगुप्तांचा जन्म दिवसही मानला जातो, जो आपल्या कर्माचा हिशेब ठेवतात. अशा प्रकारे हा दिवस धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानला जातो (Do These Upay On Ganga Saptami To Get Rid Of Your Sins And Financial Crisis).

देवी गंगाला पापनाशिनी आणि मोक्षदायिनी मानले गेले आहे, म्हणून या अर्थाने गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व असते. यावेळी गंगा सप्तमी मंगळवारी 18 मे 2021 रोजी साजरी केली जात आहे. सप्तमी तिथी 18 मे रोजी दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल आणि 19 मे 2021 रोजी बुधवारी रात्री 12.50 वाजता समाप्त होईल. यावेळी ज्ञात पापांपासून मुक्त होण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी काही खास उपाय करुन आपण सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

गंगा सप्तमीला काय उपाय करावे?

1. मान्यता आहे की, गंगा सप्तमीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्याने ज्ञात आणि अज्ञात सर्व पाप नष्ट होतात. परंतु या कोरोना कालावधीत गंगा स्नानासाठी जाणे सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत घरात आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगा जल मिसळा आणि मग आंघोळ करा. आंघोळ करताना मनात ‘हर हर गंगे’ या मंत्राचा जप करा. यातून तुम्हाला गंगा स्नानाचे पुण्य मिळेल.

2. घरात आर्थिक संकट असल्यास गंगा सप्तमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी चांदी किंवा स्टीलच्या कलशात गंगा जल भरा आणि त्यामध्ये पाच बेलपत्र ठेवा. यानंतर, अनवाणी पायांनी शिव मंदिरात जा आणि शिवलिंगावर हे जल अर्पण करा आणि मनात ‘ॐ नमः शिवाय’चा जप करा. यानंतर, महादेवाला बेलपत्र अर्पण करा आणि घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा. असे केल्याने संपत्तीचे नवीन मार्ग निर्माण होतात.

3. मान-सन्मान आणि यश मिळण्यासाठी आंघोळीनंतर देवी गंगेची पूजा करा. पूजेसाठी एका पाटावर देवी गंगेची मूर्ती ठेवा आणि महादेव आणि आई पार्वतीची मूर्ती ठेवा. जर देवी गंगाचे चित्र नसेल तर महादेवाची पूजा देखील केली जाऊ शकते. यानंतर देवाला चंदन, फुले, प्रसाद, अक्षता, दक्षिणा इत्यादी अर्पण करा. यानंतर 108 वेळा ‘ॐ नमः शिवाय’चा जप करा. त्यानंतर श्रीगंगासहस्रनामस्तोत्रमचं पठण करा आणि ‘ॐ नमो भगवति हिलि हिलि मिलि मिलि गंगे माँ पावय पावय स्वाहा’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. यानंतर आरती करा आणि तुम्हाला माहित असलेल्या पापांसाठी दिलगीर व्यक्त करा.

4. गंगा सप्तमीच्या दिवशी दान करण्याचंही मोठं महत्व आहे. आंघोळ आणि पूजा केल्यावर आपण आपल्या गरजेनुसार काहीही दान करु शकता. जीवनातले अनेक त्रास यामुळे दूर होतात.

Do These Upay On Ganga Saptami To Get Rid Of Your Sins And Financial Crisis

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganga Saptami 2021 | गंगा सप्तमी, जाणून घ्या याचं महत्त्व, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि कथा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.