Vastu Tips | जर अति राग येत असेल, तर घरात वास्तुनुसार हे बदल करा…

काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो आणि ते संपूर्ण घर त्यांच्या (Vastu Tips) डोक्यावर घेतात. पण हे चुकीचं आहे. रागामुळे केवळ घरचे वातावरणच खराब होत नाही, तर त्या व्यक्तीचे स्वतःचे नुकसानही होते.

Vastu Tips | जर अति राग येत असेल, तर घरात वास्तुनुसार हे बदल करा...
Anger

मुंबई : काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो आणि ते संपूर्ण घर त्यांच्या (Vastu Tips) डोक्यावर घेतात. पण हे चुकीचं आहे. रागामुळे केवळ घरचे वातावरणच खराब होत नाही, तर त्या व्यक्तीचे स्वतःचे नुकसानही होते. म्हणूनच, प्रत्येकाने रागाच्या सवयीपासून दूर राहावे (Vastu Tips To Control Temper Issues And Easy Remedies).

परंतु कधी कधी रागाचे कारण हे व्यक्तीच्या स्वाभावासोबत आसपासची नकारात्मकता आणि वातावरणही असते. या परिस्थितीमुळे राग वाढतो. आपल्यासोबतही असेच काही घडल्यास आपल्या घरात वास्तुनुसार छोटे बदल करण्याचा प्रयत्न करा. कदाचित यामुळे आपल्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळेल.

भिंतींवर लाल रंगाचा वापर करु नका

जर तुम्हाला खूप राग येत असेल तर भिंतींवर लाल रंगाचा पेंट लावू नका. जर तो असेल तर ते बदला. लाल रंग हा मंगळाचा मानला जातो, जो आपला राग वाढवण्याचे काम करतो. याशिवाय घरात बेडशीट, कुशन कव्हर आणि पडदे अशा ठिकाणीही लाल रंगाचा वापर टाळा.

पूर्व दिशेला दिवा लावा

पूर्वेला सूर्योदय होतो. या दिशेने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घराची नकारात्मकता दूर होते आणि वातावरण सकारात्मक राहाते. या दिशेने कोणतेही भारी सामान ठेवणे टाळा.

खडे मीठ सकारात्मकता आणेल

घराच्या कोपऱ्यात आणि विशेषत: आपल्या शयनगृहातील कोपऱ्यात एका वाडग्यात खडे मीठ घाला. यामुळे घराची नकारात्मकता दूर होते आणि वातावरण शांत आणि सकारात्मक राहाते. शांत वातावरणात आपला रागही नियंत्रणात राहतो.

सकाळी उठून हात पहा

सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपल्या हातांकडे पाहा आणि मनात बोला – ‘करग्रे वसते लक्ष्मी: करमाधे सरस्वती, करमुले तू गोविंदाः प्रभाते करदर्शनम्’. यानंतर, उठून पाच वेळा देवी पृथ्वीला नमन करा. हा आपला दिवस शुभ बनवितो आणि आपल्या स्वभावात सकारात्मकता आणतो आणि संताप शांत करतो.

चंद्राची प्रार्थना करा

चंद्राचे स्वरुप थंड मानले जाते. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर तुम्ही दररोज रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यास सुरवात करा. अर्घ्य अर्पण केल्यावर राग संपवण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी चंद्रदेवाकडे प्रार्थना करा. याशिवाय, शक्य असल्यास महादेव पार्वतीला समर्पित सोमवारी उपवास करा. यामुळे आपला रागही नियंत्रित होईल आणि तुमचे त्रासही दूर होतील.

Vastu Tips To Control Temper Issues And Easy Remedies

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips Health | सततचं आजारपण दूर करायचं असेल, तर या टिप्स ट्राय करा, समस्या होईल दूर

Vastu Tips Sindoor : त्रस्त आहात, सन्मान मिळत नाहीये, पैसै नाहीत; मग कुंकू ठरेल उपयोगी; ‘हे’ एकदा कराच

Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील