Vastu Tips Sindoor : त्रस्त आहात, सन्मान मिळत नाहीये, पैसै नाहीत; मग कुंकू ठरेल उपयोगी; ‘हे’ एकदा कराच

Vastu Tips Sindoor : त्रस्त आहात, सन्मान मिळत नाहीये, पैसै नाहीत; मग कुंकू ठरेल उपयोगी; 'हे' एकदा कराच
SINDOOR

जाणून घेऊयात वास्तूशास्त्रानुसार कुंकवाचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे. आपण कुंकवाचा उपयोग आणखी कशासाठी करु शकतो. (vastu tips sindoor kunku)

prajwal dhage

|

Apr 18, 2021 | 5:59 PM

मुंबई : हिंदू धर्मात कुंकाला अतिशय महत्त्व आहे. विवाहित महिलांसाठी हा एक दागिनाच असल्याचं म्हटलं जातं. आपल्या नवऱ्याला चांगले आयुष्य लाभावे म्हणून विवाहित महिला आपल्या भांगामध्ये कुंकू लावतात. शुभ कार्य तसेच हिंदू धर्मामध्ये अनेक धार्मिक पूजांमध्येसुद्धा कुंकाचा उपयोग केला जातो. जाणून घेऊयात वास्तूशास्त्रानुसार कुंकवाचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे. आपण कुंकवाचा उपयोग आणखी कशासाठी करु शकतो. (Vastu tips know all use of Sindoor Kunku for good health wealth and money)

घरातील अडचणी दूर करण्यासाठी 

आपल्या घरात परेशानी असेल तर चमेलीच्या तेलात कुंकू मिसळून ते हनुमानाला समर्पित करावे. पुढचे पाच मंगळवार आणि शनिवारपर्यंत हनुमानाला कुंकू समर्पित करावे. त्यानंतर घरातील सगळ्या अडचणी दूर होतील.

नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी

वास्तूशास्त्रानुसार कुंकू ही शुभ गोष्ट असल्याचे म्हटले जाते. घरातील नकारात्मक गोष्टी दूर करायच्या असतील तर कुंकाचा वापर करता येतो. कुंकू तेलामध्ये मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर लावावे. घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी सलग 40 दिवस असे करावे. त्यानंतर घरातील नकारात्मक गोष्टी दूर होतील.

लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी

लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी कुंकवाचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यासाठी पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू लावावे. त्यानंतर घरात नेहमी लक्ष्मीचा वावर असेल. धन-दौलत कधीही कमी होणार नाही.

सन्मान प्राप्त करण्यासाठी

घरात किंवा कार्यालात तुम्हाला सम्नान मिळत नसेल तर कुंकाचा चांगला उपयोग होऊ शकतो. एका पानावर तुरटी आणि कुंकू पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यावे. तसेच जोतिषशास्त्रानुसार पुढच्या तीन बुधवारपर्यंत हे केल्यावर नंतर तुम्हाला लोक सन्मान द्यायला लागतील.

वैवाहिक जीवनात आनंद

जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कुंकाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विवाहित महिलेने आपले केस धुतल्यानंतर सकाळी गौरी मातेला कुंकू चढवावे. त्यानंतर वैवाहिक जीवन सुखकर होईल.

ग्रहशांतीसाठी कुंकाचा उपयोग

तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगळ ग्रह मारक ठरत असतील तर कुंकाचा चांगला उपयोग होऊ शकतो. ग्रहांना शांत करण्यासाठी कुंकू चांगल्या प्रकारे उपयोगात पडते. कुंकू वाहत्या पाण्यात सोडले तर सूर्य आणि मंगळ ग्रह शांत होतील.

इतर बातम्या :

प्रथिनेयुक्त आहार घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

कोरफडचा रस प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल अधिक !

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या कलिंगडचा रस

(Vastu tips know all use of Sindoor Kunku for good health wealth and money)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें