Omkareshwar Temple : भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रकट झाली नर्मदा नदी, श्रद्धेची अनोखी कहाणी

| Updated on: Mar 15, 2021 | 9:17 AM

ओंकारेश्वर धाम मध्य प्रदेशच्या मोक्ष दायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या नर्मदा नदीच्या तिरावर आहे (Fourth Jyotirlinga Omkareshwar Temple Lord Shiva And Narmada River Story).

Omkareshwar Temple : भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रकट झाली नर्मदा नदी, श्रद्धेची अनोखी कहाणी
Omkareshwar Temple
Follow us on

मुंबई : भगवान शंकरजींचा कणाकणात वास आहे. पण, 12 ज्योतिर्लिंग असे आहेत (Omkareshwar Temple) ज्यांच्या दर्शन तुमचे सर्व पाप मिटतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला भगवान शंकरजींच्या चौथ्या ज्योतिर्लिंगाबाबत सांगणार होतात. याला ओंकारेश्वर धाम या नावाने ओळखलं जातं. हे ओंकारेश्वर धाम मध्य प्रदेशच्या मोक्ष दायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या नर्मदा नदीच्या तिरावर आहे (Fourth Jyotirlinga Omkareshwar Temple Lord Shiva And Narmada River Story).

येथे विराजमान असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी नर्मदा नदीवरील पूलावरुन दुसऱ्या बाजुने जावं लागतं. नर्मदा नदीच्या मन्धाता आणि शिवपूर नावाच्या बेटावर ओंकारेश्वरचं पवित्र धाम आहे. मान्यतेनुसार, जेव्हा भगवान शिवचं ज्योतिर्लिंग येथे विराजमान झालं तेव्हा नर्मदा नदी यथे स्वत: प्रकट झाली होती. भगवान शिवच्या पवित्र ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यापूर्वी पहिले नर्मदेत स्नान करावं लागतं. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

राजा मान्धातीच्या तपस्येमुळे प्रसन्न झाले भगवान शंकर

ओंकारेश्वर पवित्र धामबाबत अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. मान्यतेनुसार, ओंकारेश्वर धाम मन्धाता बेटावर स्थित आहे. मन्धाता बेटावर राजा मान्धाताने येथे पर्वतावर कठीण तपस्या केली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले. तेव्हा राजाने वरदान स्वरुपात येथे निवास करण्याचं वरदान मागितलं.

त्यानंतर राजाच्या वचनानुसार येथे पवित्र ज्योतिर्लिंगाच्या रुपात भगवान शिव विराजमान झाले आणि राजाच्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक जनतेची सुरक्षा आणि रक्षा भगवान शिव स्वयं करतात. प्राचीन कथांनुसार, ओंकारेश्वरला तीर्थ नगरी ओंकार-मान्धाताच्या नावाने प्राचीन काळात ओळखलं जात होतं.

या तीर्थाचं नाव ओंकारेश्वर कसं पडलं?

राजा मान्धाता यांनी अपल्या प्रजेच्या हितासाठी आणि मोक्षसाठी तपस्या करुन भगवान शंकराला येथे विराजमान होण्याचा वरदान मागितला होता. त्यानंतर येथे पहाडावर ओंकारेश्वर तीर्थ ‘ॐ’च्या आकाराचं बनलेलं आहे. ॐ शब्दाचं उच्चारण सर्वप्रथम सृष्टिकर्ता विधाताच्या मुखातून झालं होतं. यासाठी या तिर्थाचं नाव ओंकारेश्वर आहे. मान्यतेनुसार, ॐ चा आकार तीर्थची परिक्रमा केल्यावर अत्यंत लाभदायक फळ आणि मोक्षची प्राप्ति होती (Fourth Jyotirlinga Omkareshwar Temple Lord Shiva And Narmada River Story).

नर्मदा नदीच्या दर्शनाने इच्छूक फळ मिळते

ओंकारेश्वरबाबत अनेक मान्यता आहेत. मान्यतेनुसार, येथे 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे आणि नर्मदा नदी मोक्ष दायिनी आणि. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये ओंकारेश्वरचं पवित्र ज्योतिर्लिंगही येतात.

शास्त्रातील मान्यतेनुसार, जेव्हापर्यंत तीर्थ यात्रेकरु ओंकारेश्वरचे दर्शन करुन येथील नर्मदेसह इतर नद्यांचा जल नाही चढवत तोपर्यंत त्यांची यात्रा पूर्ण मानली जात नाही. येथे नर्मदा नदीवर नेहमीच 7 दिवसांपर्यंत सूर्योदयावेळी स्नान करत ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याने रोग, कष्ट दूर होऊन इच्छुक फळ आणि मोक्षाची प्राप्ती होते.

Fourth Jyotirlinga Omkareshwar Temple Lord Shiva And Narmada River Story

संबंधित बातम्या :

Kumbh Mela 2021 : ‘कुंभ मेळा’, पहिलं शाही स्नान संपन्न, जाणून घ्या पुढील शाही स्नानाची तारीख

Mahashivratri 2021 | शिवलिंगवर दूध का चढवलं जातं, कशी सुरु झाली ही परंपरा?, जाणून घ्या