Mahashivratri 2021 | शिवलिंगवर दूध का चढवलं जातं, कशी सुरु झाली ही परंपरा?, जाणून घ्या

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ (Mahashivratri 2021) साजरी केली (Why Devotees Offer Milk On Shivling) जाते.

Mahashivratri 2021 | शिवलिंगवर दूध का चढवलं जातं, कशी सुरु झाली ही परंपरा?, जाणून घ्या
महाशिवरात्री
Nupur Chilkulwar

|

Mar 11, 2021 | 9:08 AM

मुंबई : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ (Mahashivratri 2021) साजरी केली (Why Devotees Offer Milk On Shivling) जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सांगितले जाते. आज 11 मार्च महाशिवरात्रीचा मोठा सण आहे. या दिवशीच महादेव (Mahadev) आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते, असे पुराणात म्हटले जाते. म्हणून, महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधिनुसार व्रत करतो, त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे (Mahavsihratri 2021 Know Why Devotees Offer Milk On Shivling).

या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन भगवान शंकराची पूजा करतात. त्यानंतर शिवलिंगावर दूध, धतुरा, भांग आणि बेलपत्र वाहिले जातात.

शास्त्रांनुसार, दूध हे सात्विक मानलं जातं. मान्यता आहे की शिवलिंगावर दूध चढवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सोमवारी दुधाचं दान केल्याने चंद्रमा मजबूत होतो. शिवजीच्या रुद्राभिषेकात दुधाचा विशेष प्रयोग केला जातो. या दिवशी अनेकजण उपवास ठेवतात. पण, तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकरावर दूध का चढवलं जातं.

शिवलिंगावर दुधाने अभिषेक का केला जातो?

दूध वाहण्याची ही परंपरा सागर मंथनशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनमधून सर्वात पहिले हलाहल विष निघालं होतं. त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवता आणि दैत्य जळू लागले. त्यामुळे सर्वांनी भगवान शंकरजींकडे प्रार्थना केली. देवातांची प्रार्थना ऐकून भगवान शिवने त्या विषला तळहातावर ठेवलं आणि विषपान केलं. पण, त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकण्ठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

या विषचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटामधील देवी गंगावर होऊ लागला. विषच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला. भगवान शिवने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरिरावरील विषचा प्रभाव कमी होऊ लगला. तेव्हापासून शिवलिंगवर दूध वाहण्याची परंपरा सुरु झाली.

उज्जैनच्या महाकाल मंदिरातील ‘शिवाभिषेक’

महादेवाची पूजा करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

– महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करावी. शास्त्रातसुद्धा शिवलिंगाची उपासना सर्वोत्तम मानली गेली आहे.

– प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा केली गेली, तर ती चांगली मानली जाते. असे मानले जाते की, प्रदोष काळात भगवान शिव स्वत: शिवलिंगात वास राहतात. सूर्यास्ताच्या एक तासापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सुमारे एक तास हा प्रदोष काळ मानला जातो.

– पूजेच्या वेळी महादेवाला पांढरी फुले अर्पण करा. महादेवाला आक फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शक्य असल्यास पूजेच्या वेळी स्वत: लाल किंवा पांढर्‍या रंगाचे कपडे घाला.

– बेलपत्र आणि धोत्रा अर्पण केल्याने देखील महादेव खूप आनंदी होतात. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्यावर चंदनाने ‘ऊँ नमः शिवाय’ अवश्य लिहा. याचबरोबर त्यांना अक्षत देखील अर्पण करा.

– महादेव पूजा करण्यापूर्वी, नंदी उपासना करा आणि शक्य असल्यास, या दिवशी एखाद्या बैलाल हिरव्या चारा खाऊ घाला.

– महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून आजच्या रात्री मणका ताठ ठेवून, बसून महादेवाचे ध्यान केले पाहिजे.(Mahavsihratri 2021 Know Why Devotees Offer Milk On Shivling)

चुकूनही करू नका ‘या’ चुका!

– शिवलिंगाला अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टी सेवन करू नका.

– महादेवाचा जलाभिषेक कमळ किंवा कोणत्याही कलशामधून करा. जालाभिषेकासाठी चुकूनही शंख वापरू नका.

– महादेवाचा उपासनेत तुळस, चाफा किंवा केतकीची फुले वापरू नका.

– या दिवशी कोणाचीही फसवणूक करू नका. तसेच, कोणाचाही अपमान करू नका.

– महादेवाच्या पूजेच्या वेळी काळे कपडे घालू नका.

Mahavsihratri 2021 Know Why Devotees Offer Milk On Shivling

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

संबंधित बातम्या :

Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र  ‘या’ चुका करणे टाळा!

Mahashivratri 2021 : शिवलिंगावर चुकूनही वाहू नका ‘या’ गोष्टी, घरी पैसा टिकणार नाही

Mahashivratri 2021 : जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें