Lalbaugcha Raja 2021 | लालबागचा राजा विष्णू अवतारात, शेष नागावर आरुढ लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक

| Updated on: Sep 10, 2021 | 2:06 PM

मुंबईसोबतच संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन अखेर घडलं आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या सर्व भक्तांच्या नजरा आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाकडे लागलेल्य होत्या. अखेर ते दर्शन झालं आहे. लालबागचा राजाचा फर्स्ट लूक अखेर समोर आला आहे.

Lalbaugcha Raja 2021 | लालबागचा राजा विष्णू अवतारात, शेष नागावर आरुढ लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक
Lalbaugcha raja
Follow us on

मुंबई : मुंबईसोबतच संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन अखेर घडलं आहे. आज गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या सर्व भक्तांच्या नजरा आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाकडे लागलेल्य होत्या. अखेर ते दर्शन झालं आहे. लालबागचा राजाचा फर्स्ट लूक अखेर समोर आला आहे.

लालबागच्या राजाची यंदाची मूर्ती कशी असेल याची सर्वच आतुरतेने वाट पाहात होते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना नेमका राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेला दोन तास उशिर झाला. मात्र, अखेर राजाची पहिली झलक भक्तांना मिळाली.

लालबागचा राजा प्रथम दर्शन

राजाचं विष्णू अवतार रुप

यंदा लालबागच्या राजाचं विष्णू रुप अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा शेष नागावर विराजमान असलेला यावेळी दिसतो आहे. त्याच्या एका हातात भगवान विष्णूचे सुदर्शनचक्र आहे. तर एका हातात शंख आहे. तसेच, भव्य अशा शेष नागावर लालबागचा राजा विराजमान झाला आहे. पिवळ्या पितांबरमधील राजाचं हे विष्णू रुप डोळ्याचं पारणं भेडणारं आहे.

Lalbaugcha raja

नेता असो वा अभिनेता, गर्दी होऊ देणार नाही – विश्वास नांगरे-पाटील

नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, अशा शब्दात मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil ) यांनी लालबागमध्ये जाऊन ठणकावलं. नांगरे पाटील यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली. पोलिसांनी आधी लालबाग परिसरातील दुकानं बंद केली होती. त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला होता. मग पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा करुन मध्यस्थीचा मार्ग काढला. त्यानंतर दुकानं सुरु करण्यात आली.

लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही. मग स्थानिक रहिवाशांची दुकानं का बंद करण्यात आलीत, असा प्रश्न लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत. यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवला.

संबंधित बातम्या :

नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, लालबागमध्ये जाऊन नांगरे पाटलांनी ठणकावलं

Lalbaugcha raja 2021 : लालबागाचा राजा विराजमान होण्यास विलंब, पोलीस आणि रहिवाशांमध्ये बैठक, नांगरे पाटील घटनास्थळी