
Ganesh Chaturthi Wishes : अबालवृद्धाचे लाडके दैवत श्री गणरायाच्याय आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा २७ ऑगस्ट २०२५ ( बुधवार ) रोजी गणेश चुतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी मोठ्या उत्साहाने वाजतगाजत गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले जाते. हा सण गणेश चतुर्थीला प्रारंभ होऊन अनंत चतुदर्शीपर्यंत चालतो. गणेश चतुर्थीला बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. बाप्पाच्या आगमनाने मग घरातील वातावरण दहा दिवस आरत्या आणि फुले, अगरबत्ती यांच्या सुवासाने दरवळून जाते. गणेश चतुर्थीला सारेजण एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला जातात. एकमेकांना शुभेच्छा देतात. असे निवडक दहा शुभेच्छा संदेश येथे आपण देत आहोत.
१) पुजेत ज्यांना आहे प्रथम स्थान,
जे करतात लोकांचे शुभ कल्याण,
गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर सदैव राहो,
गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
२) गौरीपुत्रा तु गणपती,
ऐकावी भक्तांची विनंती,
मी तुमचा चरणार्थी,
रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
३) गणेश चतुर्थी
तुमच्या कुटुंबासाठी
अनंत आनंदाचे
आणि प्रेमाचे क्षण घेऊन येवो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
४) गणराया तुझ्या येण्याने
सुख,समृद्धी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशीर्वादाने यश लाभले असाच आशीवार्द राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
५ ) मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करु काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
६) श्रींच्या चरणी कर माझे जुळले,
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभले,
अशीच कृपा सतत राहू दे
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
७) स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा,
तुझ्या नावातच समाधान आहे
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
८ ) तुच सुखकर्ता, तुच दु:ख हर्ता,
अवघ्या दीनांच्या नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा…
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
९) वक्रतुंड महाकाय
सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा||
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया !
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
१०) मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला,
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेशभक्तांना
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !