Garud Puran : अत्यंत प्रभावी आहेत गरूड पुराणातले हे दोन उपाय, आर्थिक समस्या होतात दूर

आप्तजणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण 13 दिवस घरात गरुड पुराणाचे पठण केले जात असल्याने लोकं त्याचे पठण करण्यास संकोच करतात. असे असले तरी, आपण सामान्यतः घरी त्याचे वाचन करू शकता.

Garud Puran : अत्यंत प्रभावी आहेत गरूड पुराणातले हे दोन उपाय, आर्थिक समस्या होतात दूर
गरूड पूराण
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 23, 2023 | 4:29 PM

 मुंबई :  हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक मानले जाणारे गरुड पुराण (Garud Puran Upay), यशस्वी आणि आनंदी जीवनाचे गहन रहस्य सांगते. त्याचे पठण केल्याने माणसाला अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होते, ज्यामुळे तो आपले जीवन अतिशय साधेपणाने जगू शकतो. परंतु   आप्तजणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण 13 दिवस घरात गरुड पुराणाचे पठण केले जात असल्याने लोकं त्याचे पठण करण्यास संकोच करतात. असे असले तरी, आपण सामान्यतः घरी त्याचे वाचन करू शकता.  गरुड पुराणात जे काही सांगितले आहे ते भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील धर्म-कर्माबद्दलचे संभाषण आहे. म्हणूनच गरुड पुराण केवळ जन्म, मृत्यू, नरक आणि स्वर्ग याबद्दलच बोलत नाही तर ज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र, नियम आणि यशस्वी आनंदी जीवनाबद्दल देखील आहे.

काय सांगीतले आहे गरूड पुराणात?

  1.  पती पत्नीच्या नात्यात विश्वासाचा अभाव आल्यास कुटुंब तुटतं. त्यामुळं विश्वासाला तडा जाईल, असं कोणतंही काम करु नका, परिस्थितीअनुरुप निर्णय घ्या, असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे.
  2.  प्रयत्न करुनही एखादं काम न झाल्यास त्यामुळं प्रचंड त्रास होतो. अशा वेळी तुमचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. चूक कुठे घडली, त्याचं कारण शोधा. नव्यानं प्रयत्न करा, नकारात्मकतेचा तुमच्या जीवनात थारा देऊ नका.
  3. गरुड पुराणानुसार, जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांशी झगडत असाल आणि गरिबी दूर करू इच्छित असाल, तर त्यासाठी ग्रंथात मंत्र सांगण्यात आला आहे. ज्याचा जप केल्याने आर्थिक संकट दूर होऊन व्यक्तीचे जीवन धन-धान्याने भरून जाते. मंत्र खालीलप्रमाणे आहे-
    ‘ओम जुनं स:’ या मंत्राचा जप करण्यासोबतच श्री विष्णु सहस्त्रनामचा पाठही करावा. सतत 6 महिने हा पठण केल्याने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांपासून कायमची मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)