
मुंबई : जन्माबरोबरच मृत्यूच्या संदर्भात अनेक प्रकाच्या गोष्ठी अजुनही रहस्य आहेत. मृत्यूनंतर काय होते हे कोणालाच माहीत नाही. नुसते धर्मग्रंथ आणि उपनिषदांचे मत देऊन अनेक जण स्वर्ग-नरकाबद्दल बोलतात. मातेच्या उदरात नऊ महिन्यांनी बाळाचा जन्म होतो. त्याचप्रमाणे, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या अगदी नऊ महिने आधी अशा घटना घडू लागतात, जे मृत्यू दर्शवतात (Signs before death). पण धावपळीच्या जीवनात या संकेतांकडे किंचितही लक्ष दिले जात नाही. गरुड पुराण, सामुद्रिक शास्त्र, स्वप्न शास्त्र इत्यादी पुराणानुसार माणसाच्या मृत्यूच्या आधी सहा महिने जाऊ शकतात. जाणून घ्या, मृत्यूपूर्वी व्यक्तीला कोणत्या प्रकारचे लक्षण दिसू लागतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार, व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या रेषा देखील मृत्यू दर्शवतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा हलक्या आणि अस्पष्ट होतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवू लागते. बरेच लोक त्यांच्या पूर्वजांनाच बघू लागतात.
जर एखाद्या व्यक्तीला अशक्तपणाची तक्रार नसेल तर उठताना, बसताना किंवा प्रवास करताना अचानक डोळ्यांसमोर अंधार येतो. असे प्रकार वारंवार घडत असतील तर ताबडतोब सावध व्हा.
जर एखाद्या व्यक्तीला पाणी, तेल, आरसा किंवा स्वतःची सावली विचित्र दृष्टीकोनातून दिसू लागली तर समजून घ्या की मृत्यूला काही महिनेच उरले आहेत.
अनेकांना अशुभ चिन्हे दिसू लागतात. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला गाढवावरून प्रवास करताना पाहिले तर स्वप्नात मृत व्यक्ती किंवा पूर्वज दिसणे हे देखील मृत्यू जवळ येण्याचे लक्षण असू शकते.
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा तो माणूस त्याच्या जवळ बसलेल्या व्यक्तीलाही दिसत नाही. अशा वेळी यमाचे दूत दिसू लागतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)