Gupt Navratri : शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी गुप्त नवरात्रीच्या आठव्या दिवशी अशाप्रकारे करा उपासना

| Updated on: Feb 17, 2024 | 9:56 AM

Mata Baglamukhi दहा महाविद्यांमध्ये आठव्या स्थानी माता बगलामुखीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, गुजरातचे सौराष्ट्र हे माता बगलामुखीचे दर्शनाचे स्थान मानले जाते. सौराष्ट्रात आलेले वादळ शांत करण्यासाठी भगवान विष्णूने माता बगलामुखीची तपश्चर्या केल्याचे शास्त्रात सांगितले आहे.

Gupt Navratri : शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी गुप्त नवरात्रीच्या आठव्या दिवशी अशाप्रकारे करा उपासना
माता बगलामुखी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई :  10 फेब्रुवारीपासून माघ गुप्त नवरात्रीला (Magh Gupt Navratri) सुरूवात झाली आहे. आज गुप्त नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच अष्टमी आहे. वर्षभरात देवीचे चार नवरात्र येतात त्यापैकी दोन दृष्य आणि दोन गुप्त नवरात्री असतात. गुप्त नवरात्रीची पूजा ही गुप्त पद्धतीने केली जाते. या नवरात्रीत देखील देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीची उपासना मणूष्याला प्रगती आणि किर्ती प्राप्त करते. अनेकजण व्यावसाय किंवा नोकरीत असताना विरोधकांच्या कारवायांना बळी पडतात. अशावेळेस त्या व्यक्तीसमोर समस्यांचा डोंगर उभा राहातो. शत्रूंच्या कारवायांना उधळून लावण्यासाठी गुप्त नवरात्रीच्या आठव्या दिवशी काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे जीवनात प्रगतीचा मार्ग सुककर होतो.

गुप्त नवरात्रीच्या आठव्या दिवशी कोणत्या देवीची उपासना करावी?

दहा महाविद्यांमध्ये आठव्या स्थानी माता बगलामुखीची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, गुजरातचे सौराष्ट्र हे माता बगलामुखीचे दर्शनाचे स्थान मानले जाते. सौराष्ट्रात आलेले वादळ शांत करण्यासाठी भगवान विष्णूने माता बगलामुखीची तपश्चर्या केल्याचे शास्त्रात सांगितले आहे.
भगवान विष्णूंनी केलेल्या तपश्चर्येमुळे माता बगलामुखी प्रकट झाली. रात्री महाविद्येची उपासना करणे खूप लाभदायक आहे. बगलामुखी मातेला पिवळा रंग खूप आवडतो, त्यामुळे भक्तांनी मातेची पूजा करताना विशेषतः पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत.

बगलामुखी माता शत्रूंवर विजय मिळवून देते का?

श्रद्धेनुसार माता बगलामुखी आपल्या भक्तांच्या मनातील भीती काढून टाकते आणि त्यांना शत्रूंवर विजय मिळवून देते. तसेच न्यायालयीन बाबतीत जिंकण्यासाठी माता बगलामुखीची पूजा अचुक मानली जाते.  माता बगलामुखी भक्तांचा नाश करते असे म्हटले जाते. बगलामुखी मातेची पूजा केल्याने भक्त भयंकर रोगांवर मात करतो. बगलामुखी मातेच्या कृपेने भक्ताच्या सर्व प्रकारच्या अडचणी व अडथळे नष्ट होतात. गरिबी दूर करण्यासाठी बगलामुखी मातेची पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

माता बगलामुखी पूजेची पद्धत

माता बगलामुखीची पूजा करण्यापूर्वी स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावे. माता बगलामुखीचे फोटो किंवा मूर्ती पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवावी. त्यानंतर मूर्तीला पिवळी फुले,पिवळी फळे व पिवळी मिठाई अर्पण करावी. त्यानंतर आईला हळदीचा तिलक लावा, शक्य असल्यास संपूर्ण हळद देवीला अर्पण करावी. तसेच पुष्पहार अर्पण करावा. माता बगलामुखीची उपासना करणाऱ्या भक्तांनी सात्विक भोजनाबरोबरच आचरण सात्विक ठेवावे. असे मानले जाते की जर भक्ताने या पद्धतीने माता बगलामुखीची खऱ्या मनाने आणि भक्तीने पूजा केली तर माता बगलामुखी लवकरच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते.

माता बगलामुखी मंत्राचा जप

“ऊँ ह्रीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय, जिह्ववां कीलय, बुद्धि विनाशय, ह्रीं ॐ स्वाहा”

या मंत्राचा किमान 108 वेळा जप केल्याने माता बगलामुखी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना सर्व दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्त करते असे मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)