Guru Gobind Singh Jayanti 2022 | जाणून घ्या गुरू गोविंद सिंग यांच्या बद्दलच्या कधीही समोर न आलेल्या 6 गोष्टी

| Updated on: Jan 05, 2022 | 8:46 PM

गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त गुरुजींशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या.

Guru Gobind Singh Jayanti 2022 | जाणून घ्या गुरू गोविंद सिंग यांच्या बद्दलच्या कधीही समोर न आलेल्या 6 गोष्टी
Guru Gobind Singh
Follow us on

मुंबई : दरवर्षी गुरू गोविंद सिंग यांची जयंती देशभरातील शीख समुदायामध्ये प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते. गुरु गोविंद सिंग हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे महान पुरुष होते. त्यांनी खालसा पंथची स्थापना केली. यावर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती रविवार, ९ जानेवारी रोजी येत आहे. या दिवशी गुरुद्वारांना सजवले जाते. लोक गुरूद्वारामध्ये प्रार्थना, भजन, कीर्तन घेऊन त्यांना आदरांजली वाहतात आणि गुरु गोविंद सिंग जी यांनी सांगितलेल्या धर्माच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात. चला तर या प्रसंगी गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त गुरुजींशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या.

गुरु गोविंद सिंह यांच्याशी संबंधित खास गोष्टी
1. पंचांगानुसार पौष शुक्ल सप्तमीला पटनामधील साहिबमध्ये गुरु गोविंद सिंह यांचा जन्म झाला होता. या वर्षी पौष शुक्ल सप्तमी तिथी शनिवार, 08 जानेवारी रोजी रात्री 10:42 वाजता सुरू होईल आणि 09 जानेवारी रोजी रात्री 11:08 वाजता समाप्त होईल.

2. गुरु गोविंद सिंग यांचे बालपणी गोविंद राय असे नाव होते. १६९९ मध्ये बैसाखीच्या दिवशी पंज प्यारांचं अमृत पिऊन गुरुजी गोविंद राय यांच्याकडून गुरु गोविंद सिंग बनले.

3. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10 वे आणि शेवटचे गुरू होते. गुरू गोविंद सिंग यांनी गुरुपद्धती रद्द करून गुरु ग्रंथ साहिबला सर्वोच्च घोषित केले, त्यानंतर गुरु ग्रंथ साहिबची पूजा झाली आणि गुरुपद्धती संपुष्टात आली. शीख समुदायात, गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर, गुरु ग्रंथ साहिब हे मार्गदर्शक आणि पवित्र ग्रंथ म्हणून पूजले जाते.

4. गुरू गोविंद सिंग यांनी खालसा भाषण दिले – वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फत्ते. गुरू गोबिंग सिंग यांनी खालसा पंथाच्या रक्षणासाठी मुघल आणि त्यांच्या मित्रपक्षांशी अनेक वेळा युद्ध केले.

5. त्यांनी जीवन जगण्याची पाच तत्त्वे दिली. जे पाच काकर म्हणून ओळखले जातात. पंच ककर म्हणजे ‘क’ शब्दापासून सुरू होणाऱ्या त्या 5 गोष्टी, ज्या प्रत्येक खालसा शीखने परिधान करणे अनिवार्य आहे.

6. गुरु गोविंद सिंग संस्कृत, फारसी, पंजाबी आणि अरबी इत्यादी अनेक भाषांमध्ये पारंगत होते. ते उत्तम लेखकही होते. त्यांनी अनेक ग्रंथ रचले, जे आजही शिखांमध्ये अत्यंत काळजीपूर्वक वाचले जातात.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या

Numerology | ठरवलं की पूर्ण करणारच, हीच या शुभअंकांच्या व्यक्तींची ओळख

Pausha Putrada Ekadashi 2022| पौष पुत्रदा एकादशी म्हणजे नक्की काय, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजा करण्याची पद्धत

Mangal Dosh Nivaran | मंगळ दोष दूर करण्यासाठी हे उपाय करा, सर्वकाही ‘मंगलमय’ होईल