Mangal Upay 2025: प्रत्येक मंगळवारी किती दिवे पेटवले पाहिजे? यंदाचं वर्ष का आहे खास?; कुणालाच माहीत नसेल अशी…
Tuesday Upay for 2025: मंगळ आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे पाहायला मिळते. 2025 हे वर्ष मंगळाचे वर्ष मानले जाते. 2025 मध्ये हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते. अशा परिस्थितीमध्ये मंगळवारच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते.

हिंदू धर्मात 2025 हे वर्ष मंगळाचे वर्ष मानले जाते. त्याचे कारण म्हणजे 2+0+2+5=9 आणि 9 हे मुलांक मंगळाचे मानले जाते. 2025 मध्ये हनुमानाची आणि मंगळ देवाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. हनुमानाची पूजा विविध प्रकारे केली जाते. मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल अशा लोकांनी यंदाच्या वर्षी या लेकांनी एनेक उपाय केले पाहिजेल. मांगलिक लोकांनी 2025मध्ये काही विशेष उपाय केल्यास त्यांना त्याचे चांगले फळ मिळू शकते. 2025 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी शुभ फळ घेऊन आले आहे.
तुमच्या कुंडलीमधील मंगळ सक्रिय झाल्यामुळे अनेकदा तुम्हाला राग येणे, सतत चिडचिड होणे अशा समस्या होतात. 2025 मध्या काही उपाय केल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहिल त्यासोबतच तुमच्या आयुष्यामधील अडथळे कमी होण्यास मदत होईल. मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित आहे. मंगळवारच्या दिवशी मनापासून हनुमानाची पूजा केल्यास तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते. अनेकजण मंगळवारच्या दिवशी हनुमानाचे व्रत करतात ज्यामुळे त्यांच्या शरीरातील उर्जा निर्माण होण्यास मदत होते.
मंगळवारच्या दिवशी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. हिंदू धर्मात चार मुखी दिव्याला धार्मिक महत्त्व आहे. चार मुखी दिवा चार दिशांचे प्रतिनिधित्व करते. घरामध्ये मंगळवारी चार मुखी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होते. हा मंगळवारचा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाते. हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ उर्जा आणि उत्साहाचा ग्रह मानला जातो. चार मुखी दिवा लावल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगळ ग्रह शांत राहाण्यास मदत होते त्यासोबतच मंगळचा सकारात्मक प्रभाव आणि उर्जा तुमच्या आयुष्यावर पडतो. मंगळवारी पंचमुखी दिवा लावण्याचे देखील अनेक फायदे आहेत. मान्यतेनुसार, मंगळवारी घरामध्ये पंचमुखी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते. पंचमुखी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील धनसंपत्ती वाढते आणि अर्थिक लाभ होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी दिवा लावल्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.
या मंगळाच्या वर्षात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोनमुखी दिवा लावा. मान्यतेनुसार दोन मुखी दिवा लावल्यामुळे व्यक्तीच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला चांगले परिणाम दिसू लागतात. याशिवाय तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो दूर होण्यास मदत होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर दोन मुखी दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते.
