
अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास अनेक पुण्य प्राप्त होतात. हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार अमावस्येला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. यावर्षी पौष महिन्यात येणारी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे. पौष महिन्यात येणारी अमावस्या सोमवारी आहे. हिंदू मान्यतेनुसार सोमवारी कोणतीही अमावस्या आल्यास तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केली जाते. या आमावस्येच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केल्याने विशेष फळप्राप्ती होते. पितरांचे तर्पण आणि पिंडदान सोमवती अमावस्येला केल्या जाते. असे केल्याने पितर आशीर्वाद देतात. जाणून घेऊया यावर्षीची सोमवती अमावस्या कधी आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे?
पंचांगानुसार पौष महिन्याची आणि यावर्षीची शेवटची अमावस्या 30 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी सोमवार असणार आहे. त्यामुळे ही सोमवती अमावस्या आहे. 30 डिसेंबरला पहाटे 4:01 मिनिटांनी ही अमावस्या सुरू होईल आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 मिनिटांनी अमावस्या संपेल. उदय तिथीनुसार ही अमावस्या 30 डिसेंबरला असेल.
आमावस्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त पहाटे 5: 24 ते 6: 19 पर्यंत आहे. अभिजीत मुहूर्त दुपारी 12: 3 ते 12:45 पर्यंत आहे. पौष महिन्यातील अमावस्येला सकाळपासून ते रात्री 8: 32 मिनिटांपर्यंत वृद्धी योग आहे.
अमावस्या जर सोमवारी असली तर ती अमावस्या आणखीन महत्त्वाची ठरते. सोमवती अमावस्येला महादेव आणि पार्वतीची पूजा करणाऱ्यांना शुभ फळ प्राप्ती होते. या सोबतच घरात सुख, शांती येते. जे कोणी अमावस्येला पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करतात ते पितरांच्या पितृदोषातून मुक्त होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)