
ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तो तुमच्या जीवनात असणाऱ्या शुभ ग्रहांचा प्रभाव कमी करतो. असं मानलं जातं की ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे, त्या व्यक्तीला वयाच्या 42 वर्षापर्यंत त्याचा प्रचंड त्रास होतो, मात्र त्यानंतर त्याचा प्रभाव हा कमी होत जातो. मात्र तरी देखील जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तुम्हाला कोणत्याही ग्रहाचं शुभ फळ मिळत नाही.
कालसर्प दोष कसा ओळखायचा?
असं म्हणतात स्वप्न तुमच्या जीवनाचा आरसा असतात, स्वप्नशास्त्रात असं म्हटलं आहे की तुम्हाला जी स्वप्न पडतात त्यातील अनेक स्वप्न अशी असतात जी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टींचे संकेत देत असतात. कालसर्प दोष ज्याच्या कुंडलीमध्ये आहे अशा व्यक्तीला काही विचित्र स्वप्न पडतात असं मानलं जातं.तसेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे, अशा व्यक्तींना सापांपासून भीती वाटते. ज्या व्यक्तींना वारंवार सापाशी संबंधित स्वप्न पडतात जसे की एकाचवेळी अनेक साप दिसतात, साप चावण्याचा प्रयत्न करत आहे असं स्वप्नात दिसतं किंवा साप तुमच्या अंगावर चढत आहे असं स्वप्न ज्या व्यक्तीला वारंवार पडतं तर त्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असू शकतो. तुमच्याही कुंडलीमध्ये जर कालसर्प योग असेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण त्यासाठी देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्द जाणून घेऊयात.
कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय
जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तुम्ही विष्णूची भक्ती केली पाहिजे
चांदी किंवा तांब्यापासून बनवण्यात आलेली नागाच्या आकाराची अंगठी तुम्ही तुमच्या बोटात घालू शकतात
शनिवारी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावा
नागदेवतेची पूजा करा, चांदीच्या नागाची प्रतिकृती तयार करून अमावस्येच्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडून द्या
महादेवांची भक्ती आणि प्रार्थना करा
पंचनागाची पूजा करा, पंचनाग मंत्राचा जाप करा
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)