
ज्योतिषशास्त्रानुसार आपण वास्तुशास्त्राला देखील महत्व आहे. घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहावं यासाठी आपल्यापैकी अनेकजण वास्तू शास्त्राची मदत घेतो. आपल्या घरातील काही खास गोष्टींसाठी वास्तूमध्ये खास नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमानुसार आपण घर सजवताना वस्तू ठेवत असतो. जेणे करून घरात सकारात्मक ऊर्जा राहील. तर वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात भिंतीवर घड्याळ असते. घड्याळ हे वेळेचे निरीक्षण करण्याचे साधन मानले जात असले तरी, त्याचा घराच्या उर्जेवर आणि वातावरणावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य दिशेने घड्याळ ठेवल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. तथापि, चुकीच्या ठिकाणी घड्याळ ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण भिंतीवर घड्याळ ठेवताना कोणते वास्तु नियम लक्षात ठेवले पाहिजेत ते जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला भिंतीवरील घड्याळ लावावे. घड्याळ भिंतीवर लावण्यासाठी या दोन्ही दिशा सर्वात शुभ मानल्या जातात. उत्तर दिशा धनाच्या देवता कुबेराशी संबंधित आहे, तर पूर्व दिशा भगवान सूर्याशी संबंधित आहे. या दिशांना ऊर्जा आणि सकारात्मकतेच्या दिशा मानल्या जातात. या दिशांना घड्याळ ठेवल्याने घरात प्रगती, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला घड्याळ लावण्यास मनाई आहे. कारण या दिशेला घड्याळ लावल्याले सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखला जातो. तसेच याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर, कौटुंबिक संबंधांवर आणि मानसिक शांतीवर होऊ शकतो. त्यामुळे जीवनात अडथळे आणि ताणतणाव देखील वाढू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार ड्रॉईंग रूममध्ये पेंडुलम घड्याळ लावावे. तथापि बेडरूममध्ये घड्याळ ठेवताना काळजी घ्यावी. घड्याळ थेट बेडच्या समोर ठेवू नये. शिवाय, घड्याळ थेट डोक्याच्या मागे ठेवू नये. घड्याळाच्या समोर आरसा लावलेला नसावा याची खात्री करा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)