Chanakya Niti | ‘या’ 5 सवयींमध्ये वेळीच सुधारणा करा, कधीच पैशांची चणचण भासणार नाही!

| Updated on: Dec 17, 2021 | 3:16 PM

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथात व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सूत्रांच्या रूपात सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी अशा काही सवयी देखील सांगितल्या आहेत. त्या सवयी वेळीच सुधारल्या नाहीत तर आयुष्य उद्ध्वस्त व्हावे लागते.

Chanakya Niti | या 5 सवयींमध्ये वेळीच सुधारणा करा, कधीच पैशांची चणचण भासणार नाही!
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : असे म्हणतात की माणूस स्वतःचे नशीब स्वतःच लिहितो. हे देखील बऱ्याच अंशी खरे आहे. एखाद्या व्यक्तीचे गुण आणि अवगुण, त्याचे चारित्र्य, वर्तन इत्यादी त्याच्या नशिबाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच माणसाने आपल्या नशिबावर विसंबून न राहता चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत आणि परिश्रम केले पाहिजे जेणेकरून तो स्वतःचे भाग्य स्वतः तयार करू शकेल.

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथात व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सूत्रांच्या रूपात सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी अशा काही सवयी देखील सांगितल्या आहेत. त्या सवयी वेळीच सुधारल्या नाहीत तर आयुष्य उद्ध्वस्त व्हावे लागते. त्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

1- जे लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात. त्यांचा पैसा जास्त काळ टिकत नाही. त्याचबरोबर त्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात की, त्या पैशाचा आनंद त्यांना हवे असतानाही घेता येत नाही. जर तुम्हाला खरंच आयुष्य आरामात जगायचं असेल तर मेहनत आणि प्रामाणिकपणे पैसे कमवा.

2- जे लोक आळशी असतात आणि सतत अंथरुणावर पडून राहतात. त्यांचे नशीब त्यांना फार काळ साथ देत नाही. माता लक्ष्मीही त्याच्यावर रागावते. अशा लोकांना गरिबीचा सामना करावा लागतो.

3-जो व्यक्ती आपले दात साफ करत नाही. जो आपल्या घरात स्वच्छता ठेवत नाही, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सर्व आजारांनी ग्रासते. अशा लोकांचा पैसा नेहमीच व्यर्थ खर्च होतो. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते, ती अशा लोकांजवळ कधीच थांबत नाही.

4- ज्यांचे मन नेहमी खाण्यात गुंतलेले असते. जे लोक नेहमी गरजेपेक्षा जास्त अन्न खातात. असे लोक आजारांना आमंत्रण देतात. पैसा त्यांच्याकडे कधीच टिकत नाही आणि त्यांना नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

5- जे लोक आपल्या बोलण्यात संयम ठेवत नाहीत किंवा कठोर शब्द बोलतात, ते नेहमी कोणाचे तरी मन दुखावतात. अशा लोकांच्या जीवनात अनेक समस्या येतात आणि लक्ष्मीजी त्यांच्यासोबत कधीच थांबत नाहीत.

संबंधित बातम्या : 

Vastu Tips : वास्तूनुसार घरातील ‘या’ ठिकाणी बूट घालू नका, वाचा याबद्दल अधिक!

फटाफट पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, तुम्हाला यश नक्की मिळेल!