
नवीन वर्षात कोणत्याही शुक्रवारी तुमच्या कमाईतील काही भाग गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.

घरामध्ये तुळशीचे रोप लावून रोज सकाळी त्यास पाणी अर्पण करावे. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. वास्तविक तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.

2022 मध्ये कोणत्याही शुक्रवारी 3 किंवा 5 अविवाहित मुलींना तांदळाची खीर खायला द्या. मुलीच्या जेवणानंतर तिला पिवळे कपडे आणि काही पैसेही द्या. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

दर बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्यावे जेणेकरून नवीन वर्षात आर्थिक संकट येऊ नये. यासोबतच घरात कोणतीही तुटलेली भांडी ठेवू नका. घरात स्वच्छता बाळगा

कोणत्याही शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूला जल अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. याशिवाय दररोज स्नान केल्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी.