
अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

एकीकडे अयोध्या याठिकाणी प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा होत होती, तर दुसरीकडे संपूर्ण भारतात उत्साहाचं आणि राममय वातावण झालं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू राम यांच्या मंदिर उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी अनेकांनी दिली.

राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी लोकांनी, सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, ऋषीमुनींनी देणग्या दिल्या.राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी कथाकार आणि अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दिली आहे.

मोरारी बापूयांनी मंदिर ट्रस्टला 18.6 कोटी रुपये दान केलं आहे. रामायणाचा प्रचार करणाऱ्या मोरारी बापूंनी ही रक्कम लोकवर्गणीतून जमा केल्याची माहिती मिळत आहे.

मोरारी बापू यांनी भारतातून 11.30 कोटी रुपये, यूके आणि युरोपमधून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडामधून 4.10 कोटी रुपये जमा केले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन मोरारी बापू यांनी केलं होतं.