घरात फिशटँक असणे शुभ कि अशुभ? त्यात किती आणि कोणते मासे पाळणे लाभदायी?

अनेकांना घरात फिशटँक ठेवणे फार आवडते पण त्याआधी हे माहित असणे गरजेचे आहे की घरात फिशटँक ठेवणे खरंच शुभ असते का? तसेच फिशटँकमध्ये किती आणि कोणते मासे पाळावे याबद्दल ही कल्पना नसते. चला चर मग जाणून घेऊयात याबद्दलची माहिती अन्यथा त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होतो.

घरात फिशटँक असणे शुभ कि अशुभ? त्यात किती आणि कोणते मासे पाळणे लाभदायी?
Is it auspicious or inauspicious to have a fish tank at home
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2025 | 7:43 PM

अनेकांना घरात फिशटँक ठेवणे आवडते. त्याला ते वेगवेगळ्या पद्धतीने सजवत असतात. तसेच त्या अनेक प्रकारचे रंगीबेरंगी मासे ठेवणे आवडते. पण वास्तुशास्त्रानुसार घरात फिशटँक ठेवणे शुभ असते का आणि जरी फिशटँक असेल तर त्यात किती मासे असावे, कोणते मासे असावेत याबद्दल अनेकांना माहित नसते. त्यामुळे त्याबाबतचे काही चुका घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करतात. चला जाणून घेऊयात याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार घरात फिशटँक ठेवणे शुभ की अशुभ?

तर वास्तुशास्त्रानुसार घरात फिशटँक ठेवणे शुभ मानले जाते. तर वास्तुनुसार त्यात माशांची संख्या 8 असावी. कारण धार्मिक दृष्टिकोनातून, 8 हा आकडा खूप शुभ मानला जातो. 8 ही एक अनंत संख्या मानली जाते. याचा अर्थ असा की तुमच्या फिशटँकमध्ये 8 मासे ठेवल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते.

फिशटँकमध्ये कोणते मासे पाळावेत?

फेंगशुईनुसार, ‘कोई’ मासा पाळणे शुभ मानले जाते. तथापि, त्याच्या मोठ्या आकारामुळे तो पाळणे सोपे नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही कोई माशाच्या जागी गोल्डफिश देखील पाळू शकता. यामुळे घरात समृद्धी येते.

फेंगशुईनुसार हे मासे पाळणे शुभ 

फेंगशुईनुसार, फिशटँकमध्ये लाल स्वॉर्डफिश आणि ब्लॅक मॉलीफिश ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. तथापि, नेहमी लक्षात ठेवा की फिशटँकमध्ये माशांची संख्या 8 पर्यंत मर्यादित असावी. मग तुम्ही त्यात विविध प्रकारचे मासे ठेवू शकता.

फेंगशुईनुसार, फिशटँकमध्ये किमान एक काळा मासा असणे आवश्यक आहे. असे मानले जाते की काळा मासा संरक्षणाचे प्रतीक आहे, म्हणजेच ते घरातील सर्व सदस्यांचे नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करतो.

फिशटँकमध्ये मासा मेला तर काय करावे?

जर फिशटँकमध्ये एखादा मासा मेला तर तो ताबडतोब नदी किंवा तलावात नेऊन टाकावा. किंवा जवळपास जो कोणता पाण्याचा स्त्रोत असेल तिथे जाऊन हा मृत मासा सोडून यावा, तसेच मृत माशाच्या रंगाचा मासा पुन्हा फिशटँकमध्ये आणू नये.

तसेच वेळोवेळी फिशटँक साफ करत राहावा. फिशटँकमधील पाणी गढूळ झाले तर ते चांगले मानले जात नाही. तसेच ते त्यातील माशांच्या आरोग्यासाठी देखील सुरक्षित मानले जात नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)