जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणे शुभ असते की अशुभ?
आजकाल अनेकांच्या घरात मातीची भांडी वापरताना पाहायला मिळतात. कारण मातीच्या भांड्यांचा वापर करण्याने देखील आपल्या दैनंदिन आयुष्यात बरेच बदल होतात असं म्हटलं जातं. या भांड्यांबद्दल वास्तुशास्त्रातही बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊयात मातीची भांडी वापरल्याने शुभ परिणाम मिळतात की अशुभ.

काहींना स्वयंपाक घरात नवनवीन प्रकारची भांडी वापरायला आवडेत. आजकाल मार्केटमध्ये तर अनेक प्रकराची भांडी आली आहेत. पण सोबतच आजकाल बरेचजण स्वयंपाक करताना मातीची भांडी वापरताना दिसतात. अनेक गृहीणींच्या स्वयंपाक घरात मातीच्या भांड्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल. पूर्वी मातीच्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ले जात असे. तथापि, काळानुसार अनेक बदल झाले आहेत. पण आता पुन्हा एकदा मातीचे भांडे वापरण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात मातीचे भांडे वापरण्याचेही आपल्या आयुष्यावर शुभ अशुभ परिणाम होतच असतात. चला जाणून घेऊयात.
स्वयंपाकघरात मातीचे भांडे वापरणे शुभ मानले जाते
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात मातीची भांडी वापरणे शुभ मानले जाते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा तर येतेच, शिवाय तुमची संपत्ती आणि समृद्धी देखील वाढते आणि समृद्धी टिकून राहते. पूर्वी घरांमध्ये मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले जात असे आणि खाल्ले जात असे. यामुळे आरोग्य चांगले राहते, तर शास्त्रांमध्ये मातीच्या भांड्यांना खूप पवित्र आणि शुभ मानले गेले आहे. त्यामुळे आजही अनेक खास प्रसंगी वापरले जातात. म्हणून, तुमच्या स्वयंपाकघरात मातीच्या भांड्यांचा वापर असणे आपल्या आरोग्यासोबतच आपल्या जीवनावरही सकारात्मक परिणाम होतो.
मातीची भांडी वापरताना काय काळजी घ्यावी?
मातीची भांडी वाईट नजरेपासून संरक्षण करतात
ही भांडी तुमच्या घरात ठेवल्याने वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो असे म्हटले जाते. ही भांडी आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात. तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी आणतील.
लग्नाच्या विधींसाठी मातीची भांडी
अनेकदा धार्मिक कार्यक्रमांमध्ये, लग्नाच्या विधींसाठी मातीची भांडी बहुतेकदा वापरली जातात. कारण ती शुभ मानली जातात. शिवाय या भांड्यांच्या माध्यामातून केलेली पूजाही पवित्रच मानली जाते. वास्तुनुसार, घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तणावपूर्ण परिस्थितीतही भांड्यातील पाणी पिल्याने आराम मिळतो.
वास्तुशास्त्रानुसार मातीच्या या वस्तू घरात असाव्यात
मातीची एखादी मूर्ती घरात असावी, ज्यामुळे समृद्धी येते सजावटीच्या वस्तू देखील मातीच्या आणल्या पाहिजेत घराच्या आग्नेय दिशेला मातीच्या फुलांची भांडी ठेवा. स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नयेत. स्वयंपाकघरात तुम्ही जे काही भांडी ठेवता ती तुटलेली किंवा तडा गेलेली नसावीत. स्वयंपाकघरात अशी भांडी ठेवणे टाळा. फक्त तीच भांडी ठेवा जी नीट असावीत. तसेच ही मातीची भांडी साफ करताना, धुतानाही योग्यरित्या आणि हळूवारपण करावीत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
