
वास्तुशास्त्रात मीठाला विशेष महत्त्व आहे. मीठ हे फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर ते ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक देखीण मानले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की मीठ उधार घेणे किंवा उधार देणे तुमच्या घराच्या सकारात्मकतेवर आणि समृद्धीवर परिणाम करू शकते? चला जाणून घेऊया मीठ कोणाला देणे किंवा कोणाकडून घेणे शुभ आहे की अशुभ?
वास्तुशास्त्रात मिठाचे महत्त्व
वास्तुशास्त्रात, मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करते असे मानले जाते. विशेषत: समुद्री मीठ किंवा ज्याला पिंक सॉल्ट असंही म्हणतात. हे मीठ घरात योग्य ठिकाणी ठेवल्याने सकारात्मकता वाढते. वास्तुनुसार, घर शुद्धीकरण आणि समृद्धीसाठी मीठ वापरले जाते. तथापि, ते उधार देणे किंवा घेण्याबद्दलही वास्तुशास्त्रात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
मीठ उधार द्या
वास्तुशास्त्रानुसार, मीठ उधार देणे सामान्यतः अशुभ मानले जाते. कारण मीठ घराची सकारात्मक ऊर्जा शोषून घेते. ते उधार दिल्याने घराची समृद्धी आणि सकारात्मकता नष्ट होऊ शकते. विशेषतः रात्री मीठ देणे किंवा घेणे निषिद्ध मानले जाते, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. म्हणून, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कोणाला मीठ देऊ किंवा बाहेरच्यांकडून ते घेऊ देखील नये.
मीठ आणि नकारात्मक ऊर्जा यांचा संबंध काय?
वास्तुमध्ये, मीठ हे कोणतीही ऊर्जा शोषून घेते असे मानले जाते. जेव्हा तुम्ही मीठ कोणाला उधार देता तेव्हा ते तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा देखील त्यासोबत दिली जाते . यामुळे ताण, आर्थिक अडचणी किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय, मीठ उधार घेतल्याने देखील समोरच्याच्या घरातील तुमच्या नकारात्मक ऊर्जा, किंवा त्यांची वाईट दृष्टी देखील त्या मीठासोबत आपल्या घरात येऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक शांती भंग होऊ शकते.
मीठ उधार घेण्याचे तोटे
म्हणून वास्तुनुसार दुसऱ्याकडून मीठ उधार घेणे किंवा देणे या दोन्ही गोष्टी अशुभ मानल्या जातात. असे केल्याने दुसऱ्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकते. त्यामुळे जर तुम्हाला मीठ हवे असेल तर तुमची ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी ते बाजारातून खरेदी करणे कधीही चांगले.
मीठाचा योग्य वापर
घर शुद्ध करण्यासाठी मीठ वापरले जाते. पाण्यात थोडसं मीठ मिसळून फरशी पुसल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घराच्या ईशान्य दिशेला मीठ ठेवल्याने सकारात्मकता वाढते. तथापि, मीठ नेहमी झाकून ठेवावे. संतुलित ऊर्जा संतुलन राखण्यासाठी जुने मीठ नियमितपणे बदलत राहणे कधीही चांगले.
मीठासाठी वास्तु उपाय
प्लास्टिक टाळून काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात मीठ साठवावे. दर अमावास्येच्या दिवशी जुने मीठ बदला. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीठ पाणी शिंपडा. स्वयंपाकघराच्या नैऋत्य दिशेला मीठ ठेवा. या उपायांमुळे घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
मीठ आणि वास्तु यांचे संतुलन
तर अशापद्धीतने योग्य पद्धतीने मीठ वापरले तर घरात समृद्धी आणि शांती येते. तसेच घरात सकारात्मक उर्जा देखील टीकून राहते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)