मंदिरात देवाच्या मूर्तीखाली लाल कापड घालणे शुभ आहे की अशुभ?

घरातील मंदिरात देवाच्या मूर्तीखाली नेहमी वस्त्र अंथरणे महत्त्वाचे असते. पण काहींच्या मंदिरात देवाच्या मूर्तीखाली लाल रंगाचे वस्त्र अंथरले जाते. पण हे लाल रंगाचे वस्त्र वापरणे शुभ असते कि अशुभ हे जाणून घेऊयात.

मंदिरात देवाच्या मूर्तीखाली लाल कापड घालणे शुभ आहे की अशुभ?
Is Red Cloth Under Deity Statues Auspicious, Vastu Shastra Insights
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2025 | 7:14 PM

वास्तूशास्त्रात जसं घराबद्दल काही नियम सांगितलेले असतात तसेच घरातील मंदिराबाबतही काही नियम सांगितलेले आहेत. कधीकधी मंदिर सजवताना किंवा पूजा करताना काही चुका होतात, ज्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत. या प्रश्नांपैकी एक म्हणजे मंदिरात कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत?

मंदीरात देवाच्या मूर्तीखाली लाल रंगाचे कापड घालावे का?  

घर सजवायला कोणाला आवडत नाही? लोक घराचा प्रत्येक कोपरा सजवतात. तसेच घरातील मंदिरही सजवतात. घराच्या मंदिरात देव-देवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवतात. तसेच मंदिरात ठेवलेली प्रत्येक वस्तू, पूजा थाळीपासून कलशापर्यंत, इत्यादी, सर्वात सुंदर असावी असाच लोकांचा प्रयत्न असतो. लोक पूजा खोलीची देखील खूप काळजी घेतात. मंदिरात वापरल्या जाणाऱ्या कापडापर्यंत स्वच्छतेबाबत अनेक नियम लोक पाळत असतात. मंदिरात देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवताना कधीही ती अशीच ठेऊ नये. मूर्तीखाली वस्त्र नेहमी घालावे. बरेच लोक मंदिरात लाल रंगाचं कापड देखील पसरवतात. मंदिरात लाल रंगाचं कापड घालणे कितीपत योग्य आहे.हे जाणून घेऊया? या रंगाचे कापड पसरवणे शुभ असते की अशुभ? जाणून घेऊयात.

लाल रंगाचे कापड शुभ की अशुभ? 

ज्योतिषशास्त्रानुसार, लाल रंग हा उर्जेने परिपूर्ण असतो आणि तो उत्कटतेचे प्रतीक मानला जातो. लाल रंग अस्वस्थता आणि उष्णता वाढवतो. मंदिरात पूजा करताना मन शांत असणे खूप महत्वाचे आहे. जर मनात स्थिरता असेल तरच तुम्ही खऱ्या मनाने मंत्रांचा जप करू शकाल किंवा पूजा करू शकाल. लाल रंग मनाला अशांत करतो, ज्यामुळे पूजा करताना योग्यरित्या लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत, मंदिरात लाल रंगाचे कपडे वापरणे योग्य मानले जात नाही.

मंदिरात या रंगाचे कापड शुभ मानले जाते.

मंदिरात कोणत्याही हलक्या रंगाचे कापड पसरवणे चांगले मानले जाते. खरं तर, हलके आणि सौम्य रंग शांती आणतात. हलक्या रंगांनी ध्यान करणे चांगले होते. जेव्हा तुम्ही एकाग्रतेने पूजा करता तेव्हा तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळते. मंदिरात पिवळ्या रंगाचे कापड पसरवणे सर्वोत्तम मानले जाते. याशिवाय, हलका निळा रंग वापरणे देखील चांगले मानले जाते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )