Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!

| Updated on: Apr 17, 2022 | 7:30 AM

घरात सुख शांती नांदावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करत असतात. अनेकदा तर गधा हमाली करूनही समस्यांचा ससेमिरा सुटता सुटत नाही. त्यामागे काही तरी दोष असण्याची शक्यता असते. आणि हे दोष दूर करण्याची गरज असते.

Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!
vastu tips
Follow us on

मुंबई: घरात सुख शांती नांदावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करत असतात. अनेकदा तर गधा हमाली करूनही समस्यांचा ससेमिरा सुटता सुटत नाही. त्यामागे काही तरी दोष असण्याची शक्यता असते. आणि हे दोष दूर करण्याची गरज असते. आयुष्य सुसह्य जगण्यासाठी वास्तूशास्त्रात (Vastu shastra) काही नियम बनवले गेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष केलं तर घरात आठराविश्व दारिद्र्य (Problems in house) आलंच म्हणून समजा. हेच कशाला या नियमाचं पालन केलं नाही तर घरात असलेल्या लोकांवरही त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात घरात ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी नियम बनवले गेले आहेत. त्याशिवाय ज्योतिषशास्त्रात (Jyotish shastra) एखाद्या गोष्टीचा व्यवहार कसा करावा याचंही मार्गदर्शन करण्यात आलं आहे. कोणत्या गोष्टी घ्याव्यात आणि कोणत्या घेऊ नयेत, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. अशा नियमांचं पालन केलं तर घरात सकारात्मकतेचा दरवळ पसरतो.

अनेकदा लोक आपल्या ओळखीच्या लोकांकडून अनेक गोष्टी घेतात. त्याची देवघेव व्यवस्थित हानीकारक असल्याचं मानलं जातं. त्यामुळे इतरांकडून गिफ्ट म्हणून कोणत्या गोष्टी घ्याव्यात आणि कोणत्या घेऊ नयेत? त्याचे परिणाम काय होतात? याबाबतची या लेखात आम्ही तुम्हाला विस्तृत माहिती देत आहोत.

रुमाल

रुमाल कुणाला गिफ्ट करू नये आणि कुणाकडून घेऊ नये असं सांगितलं जातं. एवढंच कशाला गिफ्ट देणं घेणं तर सोडाच पण दुसऱ्याचा रुमालही वापरू नये असं सांगितलं जातं. कुणाकडून रुमाल गिफ्ट घेतला तर संबंधित व्यक्तिचे इतरांशी संबंध बिघडू लागतात अशी मान्यता आहे. या लोकांचे वारंवार झगडे होतात आणि नात्यामध्ये वितुष्ट येतं असंही मानलं जातं.

मीठ

ज्योतिष शास्त्रात मीठ मागणे किंवा दान करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचा संबंध शनिदेवाशी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच कुणाकडून मीठ उधार म्हणून घेऊ नये असं म्हणतात. जर अगदीच मीठ घेण्याची गरजच पडली तर त्याबदल्यात त्या व्यक्तीला काही ना काही दिलं पाहिजे. उधारीवर मीठ घेणं म्हणजे घरात दारिद्र्याला निमंत्रण देण्यासारखं आहे. फुकटात मीठ घेतल्याने घरात नकारात्मकता पसरते, अशी मान्यता आहे.

लोखंड आणि तेल

लोखंड आणि तेल शनिदेवाचे प्रिय आहेत. त्यामुळे लोखंड किंवा तेल कुणालाही उधार देऊ नये आणि कुणाकडून उधार घेऊ नये असं सांगितलं जातं. फुकटात घेतलेलं लोखंड शनीकडून घेतलेल्या दानाच्या बरोबरीचं असल्याची मान्यता आहे. ही चुकी केल्यानंतर जर शनिची वक्रदृष्टी पडली तर संबंधित व्यक्तीला आयुष्यभर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शनिवारच्या दिवशी लोखंड आणि तेल खरेदी करणे टाळलं पाहिजे, अशी सुद्धा मान्यता आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ