धार्मिक दृष्ट्या कदंबच्या फुलाला आहे विशेष महत्त्व, या उपायांनी मिळतात चमत्कारिक फायदे

| Updated on: May 01, 2023 | 6:34 PM

कदंब वृक्षाला शास्त्रात (Vastu Tips Marathi) खूप शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की कदंब वृक्ष भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय आहे.

धार्मिक दृष्ट्या कदंबच्या फुलाला आहे विशेष महत्त्व, या उपायांनी मिळतात चमत्कारिक फायदे
कदंब फुल
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लोकं अनेक प्रकारची झाडे आणि वनस्पतींनी घर सजवतात. त्यामुळे घर सुंदर दिसते. यासोबतच घरात सकारात्मक उर्जाही संचारते. कदंब वृक्षाला शास्त्रात (Vastu Tips Marathi) खूप शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की कदंब वृक्ष भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय आहे. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाला कदंबाचे फूल अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. दुसरीकडे कदंब फुलाचे काही उपाय केल्याने व्यक्तीला जीवनात शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यही प्राप्त होते.

कदंब फुलाचे काही उपाय

  •  शास्त्रात गुरुला शुभ ग्रह मानले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा ग्रह व्यक्तीला करिअर आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये लाभ देतो. कुंडलीत बृहस्पति अनुकूल स्थितीत असेल तर व्यक्ती जीवनात खूप प्रसिद्धी मिळवते. असे म्हणतात की भगवान विष्णूला कदंबाचे फूल अर्पण केल्याने गुरु ग्रह शुभ स्थितीत राहतो.
  • शास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम-दक्षिण दिशेला कदंबाचे झाड लावल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहते.
  • शास्त्रानुसार कदंब वृक्ष कुंडलीत उपस्थित असलेल्या गुरु ग्रहाच्या त्रासापासून आराम देतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु दोष आहे त्यांनी हे फूल पाण्यात टाकून स्नान करावे. असे केल्याने व्यक्तीला गुरु दोषापासून मुक्ती मिळते.
  • ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर तोरणाच्या रूपात कदंबाचे फूल ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. याशिवाय राहूचे दुष्परिणामही कमी होऊ शकतात.
  • तर दुसरीकडे कदंबाचे फूल मंदिरात किंवा तिजोरीत ठेवल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय आर्थिक चणचणही दूर होते.
  • कदंबाची फुले कार्यालयात किंवा दुकानात ठेवल्याने प्रगतीचा मार्ग खुला होतो.
  • चांदीच्या ताटात कदंबाची फुले ठेवून देवांची पूजा केल्याने धनप्राप्ती होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)