Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalashtami 2023 : उद्या मासिक कालाष्टमी, कालभैरवाच्या कृपेने पुर्ण होतील सर्व मनोकामना

कालाष्टमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. हा दिवस भगवान कालभैरवाच्या पूजेला समर्पित आहे. या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान भैरवाचा आशीर्वाद घेतात. कालाष्टमी पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येते.

Kalashtami 2023 : उद्या मासिक कालाष्टमी, कालभैरवाच्या कृपेने पुर्ण होतील सर्व मनोकामना
कालाष्टमीImage Credit source: Social MEdia
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 11:54 AM

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी (Kalashtami July 2023) साजरी केली जाते.  कालाष्टमीला भगवान शिवाचे उग्रस्वरूप असलेल्या कालभैरवाची पूजा करण्याची पद्धत आहे. भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा आणि जगाचे रक्षण करणारा. काळभैरवाचा उपासक कधीही शत्रू, ग्रह, वाईट शक्ती, अकाली मृत्यू यांच्या भीतीने व्याकूळ होत नाही. जाणून घेऊया कालाष्टमीची तिथी, शुभ मुहूर्त आणि या दिवशी कालभैरवाच्या पूजेचे महत्त्व.

श्रावण कालाष्टमी 2023 तारीख

मासिक कालाष्टमी 9 जुलै 2023 रोजी रविवारी म्हणजेच उद्या आहे. कालभैरवाच्या भक्तांवर मृत्यूची सावलीही फिरत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. बाबा काल भैरव यांना काशीचा कोतवाल म्हणूनही ओळखले जाते. कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान काशी विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते.

कालाष्टमी 2023 मुहूर्त

पंचांगानुसार, यंदा कृष्ण पक्षातील कालाष्टमी 09 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 07.59 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 10 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 06.43 वाजता समाप्त होईल.

हे सुद्धा वाचा

कालाष्टमीला निशिता काळात तांत्रिक पूजा केली जाते, परंतु गृहस्थांनी या दिवशी प्रदोष कालात काल भैरव आणि महादेवाची पूजा करावी.

प्रदोष काल पूजेच्या वेळा – रात्री 07.22 – रात्री 9.54 (9 जुलै 2023) निशिता काल मुहूर्त – 12.06 am – 12.47 am (10 जुलै 2023)

कालाष्टमीची पूजा पद्धत

कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला दूध आणि दह्याने अभिषेक करा आणि 21 बेलपत्रावर लाल चंदनाने ओम लिहून शिवाला अर्पण करा. एकामागून एक बेलपत्र अर्पण करा आणि ‘ओम हं शं नन गण सन सन महाकाल भैरवाय नम:’ या मंत्राचा जप करत रहा. आता काल भैरवाष्टकचा जप करा. नंतर काळ्या कुत्र्याला गोड रोटी आणि गुळाची खीर खायला द्यावी, यामुळे कालभैरव खूप प्रसन्न होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.