
जगात अनेक देवळं दगडांनी बांधलेली आहेत. परंतू कल्याण पश्चिमच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले कल्याणेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. या मंदिराला स्फटिक शिव मंदिर म्हणूनही ओळखलं जाते. हे फक्त मंदिर केवळ मंदिर नाही, तर मौन, साधना आणि दिव्य ऊर्जेच्या स्पंदनांनी उभारलेलं एक पवित्र धाम बनलं आहे. हे एक साधं देवस्थान नाही, तर एक सजीव ऊर्जा यंत्र आहे, जिथे प्रत्येक कणाकणात भक्ती सामावली आहे, प्रत्येक श्वासात मंत्र आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात शिवतत्त्वाचं अस्तित्व जाणवतं.
हे भारताचं एकमेव आणि पहिलं मंदिर आहे, जिथे माँ काली, भैरव, गणपती, अखंड धुना, आणि १००१ किलो वजनाचा स्पटिक शिवलिंग एका सरळ रेषेत स्थापण केले गेले आहेत. ही रचना पूर्णतः वैदीक गणितशास्त्र आणि ऊर्जा तत्त्वांवर आधारित आहे. या स्फटिक शिव मंदिराचा केंद्रबिंदूत एक अखंड अग्नि तेवत आहे. क पवित्र अग्नि जो गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे प्रज्वलित आहे. ही केवळ जळणारी आग नसून, ती तप, श्रद्धा आणि आत्मशक्तीचं प्रतीक आहे.या शक्तीपीठाच्या आध्यात्मिक सेवेत एक तपस्विनी कार्यरत आहे. त्या भगवती अखाड्याच्या तपस्विनी साध्वी आहेत. त्यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे हे मंदिर नारीशक्ती, सेवा, साधना आणि आत्मोन्नतीचं केंद्र बनलं आहे. याच समर्पणामुळे मंदिराला त्याच्या अद्वितीय रचनेमुळे आणि आरोग्यसेवेसाठी “हेल्थ आयकॉन अवॉर्ड २०२५” (HIFA) ने सन्मानित करण्यात आलं आहे.
अखंड अग्नी – सलग १० वर्षांपासून जळणारी पवित्र अग्नी, भक्ती आणि तपशक्तीचे जिवंत प्रतीक
१००१ किलो वजनाचा स्पटिक शिवलिंग – अत्यंत दुर्मीळ, शक्तिशाली आणि ऊर्जायुक्त शिवस्वरूप
सरळ रेषेतील देवतांची स्थापना – माँ काली, भैरव, गणपती आणि शिव यांची वैदिक रचनाशास्त्रानुसार अचूक स्थापना
वैदशास्त्र रिसर्च फाउंडेशन – जिथे गृहिणी, विद्यार्थी आणि साधक संस्कृत श्लोक, शिवमहिम्न स्तोत्र व वेदांचा अभ्यास करतात
शक्तिसाधनेचं केंद्र – स्त्रियांसाठीचे आत्मबळवर्धन आणि आध्यात्मिक जागरणाचे पवित्र स्थान
उपचार आणि आध्यात्मिक थेरपी सेंटर – शरीर, मन आणि भावना यांचे वैदिक व आध्यात्मिक उपचार
मुफ्त भोजन आणि निवास सुविधा – येथे प्रत्येक श्रद्धाळूचं स्वागत प्रेम, आदर आणि सेवाभावाने केलं जातं
हे मंदिर केवळ दर्शनाचं स्थळ नाही—ते आत्मप्रबोधन आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र आहे.
जर तुम्ही केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर अंतरआत्म्याची शांतता, आत्मजागृती आणि ईश्वरानुभव शोधत असाल, तर कल्याणेश्वर महादेव
मंदिर ही तुमच्या आत्म्याला दिलेली सादच आहे.
Google Maps वर शोधा: वैदेही गणपती मंदिर, सापड, कल्याण पश्चिम
या मंदिरात अनुभवा—जिथे अग्नी बोलते, मौन आरोग्य देते, आणि शक्ती स्वतः जागृत होते
आता वेळ आली आहे—बाह्य कोलाहलातून अंतर्आत्माच्या शांततेकडे प्रवास करण्याची