स्वयंपाकघरात ‘या’ 4 वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने वाढू शकतात अडचणी, जाणून घ्या वास्तू नियम

आपण अनेकदा जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे स्वयंपाकघरात काही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवतो, ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर या वस्तूं चूकीच्या ठिकाणी ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि संघर्षही होऊ शकतो. चला तर मग कोणत्या आहेत या 4 वस्तू त्याबद्दल जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात या 4 वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने वाढू शकतात अडचणी, जाणून घ्या वास्तू नियम
Kitchen
| Edited By: | Updated on: Aug 27, 2026 | 3:33 PM

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी ठेवल्याने कधीही वास्तूदोष निर्माण होत नाहीत. त्यात तुम्ही जर या वास्तू तत्त्वांचे पालन न करता वस्तूंची मांडणी केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. असे मानले जाते की, सुव्यवस्थित स्वयंपाकघर संपूर्ण घरात समृद्धी आणते.

या कारणास्तव स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू चुकीच्या दिशेला न ठेवण्याचा सल्ला वास्तुशस्त्राद्वारे दिला जातो. शिवाय तुमच्या घरातील स्वयंपाकघर योग्य दिशेला नसल्यास यामुळे घरात आर्थिक अस्थिरता, आरोग्याच्या समस्या आणि तणावपूर्ण नातेसंबंधांना कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच घर बांधताना स्वयंपाकघर योग्य दिशेला बांधण्याची शिफारस केली जाते.

तुमचे स्वयंपाकघर आधीच बांधलेले असले तरी, त्यातील वस्तूंची योग्य मांडणी करून तुम्ही वास्तूदोष टाळू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

तवा

पोळी भाजण्यासाठी वापरलेला तवा स्वयंपाकघरात कधीही चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवू नये. तव्याचा वापर झाल्यानंतर ते उलटे करून ठेवावे. तसेच सिंकमध्ये किंवा रिकाम्या स्टोव्हवर कधीही तसेच ठेऊ नये. वास्तुदोषांच्या सर्वात सामान्य कारणांपैकी हे एक आहे. त्यामुळे भांडी नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावीत. तसेच ती अशा ठिकाणी ठेवावीत जिथे बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नजरेस ती सहज पडणार नाहीत.

पोळपाट आणि लाटणे

स्वयंपाकघरात रोजच्या वापरात असलेले पोळपाट लाटण्याचा वापर झाल्यास ते कोणत्याही धान्याच्या डब्यावर कधीही ठेवू नका. लाटणे कधीही उलटे ठेवू नका आणि वापरानंतर ते सिंकमध्ये टाकू नका.

याव्यतिरिक्त पोळ्या लाटून झाल्यावर ते कधीही अस्वच्छ सोडू नका किंवा सिंकखाली ठेवू नका. धुतल्यानंतर ते नेहमी कोरडे करा.

मीठाचा डब्बा

वास्तूनुसार स्वयंपाकघरात मिठाचा डब्बा दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला कधीही ठेवू नये. तसेच भांडे कधीही उघडे ठेवू नये आणि मीठ इतर मसाल्यांसोबत कधीही ठेवू नये. असे केल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते.

मातीची भांडी

आपल्यापैकी अनेकांच्या स्वयंपाकघरात पाण्याचे माठ ठेवलेले असतेच. पण वास्तूनुसार हे माठ चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरात संघर्ष निर्माण करते. तुम्ही पाण्याच्या माठा व्यतिरिक्त इतर मातीची भांडी नेहमी स्वयंपाकघराच्या उत्तर दिशेला ठेवावे. पाण्याचे माठ दक्षिण दिशेला ठेवणे टाळा.

तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेली असेल, तर आजच तिची जागा बदला. या वस्तूंमुळे तुमच्या घरात केवळ वास्तूदोषच निर्माण होत नाहीत, तर आर्थिक नुकसानही होऊ शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us