
पुराणांमध्ये मंगळवार हा पवनपुत्र हनुमानाला समर्पित करण्यात आला आहे. जर तुम्ही बजरंगबलीची संपूर्ण मनोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यातील बरीच दु:ख कमी होण्यास मदत होते.

हनुमंताच्या पूजेने तुमच्या मनावर ताबा मिळवता येतो. तुमच्यातील सर्व दोष दूर करतात येतात त्याच प्रमाणे या उपायामुळे आपल्याला सुख आणि संपत्ती मिळते.

अंजनीपुत्र हनुमानाची आस्थेने पुजा केल्यास आपल्या आयुष्यतील सर्व दु:ख नाहीशी होतात. या पूजेमुळे आपल्याला बुद्धी, विद्या, अलौकिक शक्ती प्राप्त होते.

बजरंगबलीची मनापासून साधना केल्याने माणसाला सर्व सांसारिक आणि दिव्य अनुभव मिळू लागतात. त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक त्रास होत नाही.हनुमानाच्या पुजेने जीवनातील कितीही मोठे संकट आपल्याला दुर करता येते. पुराणात अशी मान्यता आहे की हनुमानजीच आपला मार्ग बदण्यास मदत करतो.

असे मानले जाते की बजरंगीची साधना केल्याने हताश व्यक्तीला नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास प्राप्त होतो, कारण हनुमानजी हे सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक दुर्बलता दूर करून त्या व्यक्तीस आपार शक्ती देतात. हनुमानजींची साधना केल्याने मन शुद्ध होते. मनामधील अहंकार किंवा दु:ख दुर होतात .