
सर्व शिवभक्तांसाठी श्रावण महिना महत्त्वाचा आहे. या श्रावण महिन्यात भगवान शंकर हे संपूर्ण विश्वाचा सांभाळ करत असतात म्हणून भगवान शिवांना हा महिना समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी श्रावण महिना हा 25 जुलै रोजी सुरू होणार आहे. या पवित्र महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध आणि बिल्वपत्र अर्पण करण्यासोबतच, भगवान भोलेनाथांना त्यांचा आवडता भोग म्हणजेच नैवेद्य देखील अर्पण करावा . यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच या श्रावण महिन्यात अगदी प्रसन्नतेने पूजा केल्याने भक्तांचे सर्व त्रास देखील दूर करतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण भगवान शंकर यांना काय आवडते ते जाणून घेऊयात…
भगवान शिव यांना भांग आणि धतुरा खूप आवडतात. शिवप्रसादात या दोन्हींचा समावेश करणे खूप शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात भांग खडीसाखरे सोबत किंवा दुधात मिक्स करून अर्पण केले जाते. ते अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते. यासोबतच धतूऱ्याचे फूल अर्पण करून भगवान शिव यांचा आशीर्वादही मिळतो.
भगवान शिव यांना बेल फळ आणि बिल्व पत्र दोन्ही खूप प्रिय आहेत. भगवान शिव यांना बेल फळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देत असतात. यासोबतच घरात धन आणि धान्याची वाढ होते.
पंचामृत हे शिवपूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे . श्रावण महिन्यात शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर ते भोग म्हणून देखील अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला पंचामृत अर्पण केल्याने त्याला आरोग्य आणि सौभाग्य मिळते.
श्रावण महिन्यात थंडाई अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान शिवाला थंडाई अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रावण सोमवारी भगवान शंकरांना रव्याची खीर आणि हलवा देखील अर्पण करता येते. असे म्हटले जाते की हे भोग अर्पण केल्याने भगवान शंकर भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात. यासोबतच जीवनात शुभता येते.