जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…

| Updated on: Apr 15, 2021 | 4:29 PM

इंद्रदेवाने चिंता व्यक्त केली की तारकासुराने अनेकदा माता पार्वतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता असे प्रयत्न सातत्याने सुरु राहतील कारण देवी पार्वतीच्या गर्भातून त्याचा मृत्यू करणारा जन्माला येणार आहे (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).

जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत...
Lord Kartikeya
Follow us on

मुंबई : देवी पार्वतीच्या डोहाळेजेवणाचा सोहळा पूर्ण झाल्यावर इंद्रदेवाने स्वर्गात वरुण देव (Lord Kartikeya), यक्ष आणि गंधर्वांकडे प्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले देवी डोहाळेजेवणाचा उत्सव खूप भव्य झाला आहे. परंतु त्याचवेळी इंद्रदेवाने चिंता व्यक्त केली की तारकासुराने अनेकदा माता पार्वतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता असे प्रयत्न सातत्याने सुरु राहतील कारण देवी पार्वतीच्या गर्भातून त्याचा मृत्यू करणारा जन्माला येणार आहे (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).

इंद्रदेव म्हणाले की पाच देवता गुप्तपणे कैलास येथे जातील आणि ताडकासूर माता पार्वतीपर्यंत पोहोचू शकत नाहीत याची काळजी घेतील. तेव्हा पाच देवतांनी कबुतराचे रुप धारण केले आणि ते कैलासवर राहू लागले. जेव्हा महादेव आणि माता पार्वती यांनी हे कबुतरे पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले की अचानक कैलासवर कबूतर कसे आले. पंचांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीला आपले खरे रुप दाखवून नमन केले आणि तेथे हजर राहण्याचे कारण सागंतिले. पण, यादरम्यान ताडकासूराने कैलास गाठले आणि त्याने संपूर्ण संभाषण गुप्तपणे ऐकले. अशा प्रकारे त्याला कळले की कैलासवर नजर ठेवण्यासाठी पाच देवता उपस्थित आहेत. यानंतर तारकासूराने कट रचला.

चला जाणून घेऊ हा कट काय होता?

महादेव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय यांचा जन्म होणार होता. महाराज हिमालय आणि त्यांची पत्नी कैलास जाण्याची तयारी करत होते. त्यांनी निर्मला नावाच्या आयालाही सोबत घेण्याचे ठरवले. त्यांना निर्मला आया म्हणून ओळखले जात असे. हीच निर्मला आया देवी पार्वतीच्या जन्माच्या वेळीही उपस्थित होती. महाराजांनी निर्मला आयाला बोलवायला महामंत्रीला पाठवले. दरम्यान, ताडकासूराला समजले की पार्वतीचे आई-वडील निर्मला आयाला घेऊन कैलास येथे जात आहेत.

महामंत्री येण्यापूर्वी तारकासूराने निर्मलाची झोपडी गाठली आणि तिची हत्या करुन तिचा रुप धारण केलं. अशा प्रकारे निर्मला आयाच्या रुपात तारकासूर कैलास येथे पोहोचला आणि बाळाचा जन्म होताच त्याने बाळाला घेतले आणि देवी पार्वतीला आराम करण्यास सांगितले. देवी पार्वती निद्रा स्थितीत आल्या तेव्हा निर्मलाचे रुप धारण केलेला तारकासूर बाळासह अदृष्य झाला.

काही वेळानंतर जेव्हा देवी पार्वतीला जाग आली तेव्हा बाळाला तिथे न पाहून त्यांना काळजी वाटली. देवी पार्वती समजून गेली की त्यांच्या पुत्राला तारकासूराला घेऊन गेला आहे. त्यांनी घोषणा केली की जर माझा पुत्र सापडला नाही तर मी माझ्या क्रोधाग्नीमध्ये संपूर्ण सृष्टीचा नाश करेन. देवी पार्वतीला इतकी विचलित झालेलं पाहून भगवान ब्रम्हा आणि भगवान विष्णू कैलासवर आले. भगवान विष्णू पार्वतीला म्हणाले, काळजी करु नका, ब्रह्माजींनी ही भविष्यवाणी केली आहे की तुमचा पुत्र सात वर्षांच्या वयात ताडकासूराचा वध करेल (Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story).

दुसरीकडे, ताडकासूराने बाळाला हिमालयच्या शिखरावरुन खाली फेकले. हे मूल कैलासचे रक्षण करणाऱ्या पाच देवतांपैकी एक असलेल्या अग्निदेवच्या कुशीत जाऊन पडले. हे बाळ खूप रडत होते. या रडणार्‍या बाळाचा आवाज ऐकून देवी गंगा तेथे पोहोचली आणि बाळाला आपल्याबरोबर घेऊन गेली. बाळाला भूक लागली होती हे देवी गंगाला समजले. म्हणून त्यांनी कृतिकांचं स्मरण केलं. तेव्हा या कृतिकांनी बाळाला स्तनपान देऊन शांत केले. बाळाने प्रथमच कृतिकांचं स्तनपान केल्याने देवी गंगाने त्याचं नाव कार्तिकेय ठेवले.

तारकासूरला खात्री होती की त्या बाळाचा मृत्यू झालाय. म्हणून त्याने त्याच्या महालात उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. कारण, त्याला आता मारणारा संपूर्ण विश्वात कोणी नव्हता. दुसरीकडे, जेव्हा अग्निदेव आणि इंद्रदेव यांची भेट झाली, तेव्हा देवराजने अग्निदेवला या अपघाताची माहिती दिली. तेव्हा अग्निदेवाने सांगितले की एक बाळ त्यांच्या कुशीत येऊन पडलं होतं.

दुसरीकडे बाळाचा शोध घेणारा वीरभद्रला देवी गंगाची भेट घेतली आणि वीरभद्र यांनी देवी गंगाला संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्याच क्षणी इंद्रदेव आणि अग्निदेव देखील तेथे पोहोचले आणि त्या बाळाचे सत्य सांगितले की हे बाळ देवी गंगाची बहिणी पार्वतीचं आहे. गंगाला हे ऐकून अत्यंत आनंद झाला आणि ते सर्व कैलासच्या दिशेने गेले.

दुसरीकडे, देवी पार्वती पुत्र वियोगामध्ये अग्नीत भस्म होणार होती, तेव्हाच त्यांच्या मोठ्या बहिणीने जल प्रवाहित केले आणि आग विझविली. देवी पार्वतीला त्यांचं बाळ सोपवलं. अशा प्रकारे कैलासवर अत्यंत आश्चर्यकारक देखावा पाहायला मिळाला.

Lord Kartikeya Get Kidnapped After His Birth Know This Interesting Story

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Matsya Jayanti 2021 | मत्स्य जयंती, भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार का घेतला? जाणून घ्या यामागील कहाणी…

Kalki Avtar | भगवान विष्णू कल्की जन्म कधी घेणार? जाणून घ्या शास्त्रांत काय लिहिलंय…

महाभारताच्या युद्धात भगदत्त अर्जुनला का मारणार होता? जाणून घ्या ही पौराणिक कहाणी…