Kalki Avtar | भगवान विष्णू कल्की जन्म कधी घेणार? जाणून घ्या शास्त्रांत काय लिहिलंय…

हिंदू धर्माच्या ग्रंथात असे वर्णन केले आहे की या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप आणि अन्याय वाढला आहे (Lord Vishnu As Kalki Avtar), तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर वाईट लोकांचा नाश करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रकट झाले आहेत.

Kalki Avtar | भगवान विष्णू कल्की जन्म कधी घेणार? जाणून घ्या शास्त्रांत काय लिहिलंय...
Kalki Avtar
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 10:45 AM

मुंबई : हिंदू धर्माच्या ग्रंथात असे वर्णन केले आहे की या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप आणि अन्याय वाढला आहे (Lord Vishnu As Kalki Avtar), तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर वाईट लोकांचा नाश करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रकट झाले आहेत. वामन अवतार, नरसिंह अवतार, मत्स्य अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार हे सर्व रुप याचे वास्तव पुरावे आहेत (When Will Lord Vishnu Take A Birth As Kalki Avtar Know Everything About It).

शास्त्रात विष्णूच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे, त्यापैकी त्यांनी आत्तापर्यंत नऊ अवतार घेतले आहेत. परंतु कलियुगातील त्यांचा अखेरचा अवतार अद्याप बाकी आहे. असे मानले जाते की जेव्हा कलियुग शिगेला पोहोचेल तेव्हा विष्णू कल्कीचा अवतार घेतील आणि कलियुग संपवून धर्मयुग स्थापन करतील.

कल्की अवतार आजही लोकांसाठी एक गूढ आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की भगवान विष्णू आपला कल्की अवतार कधी घेतील, कुठे घेतील, त्याचे रुप काय असेल, त्यांचे वाहन काय असेल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद् भगवद्गीतेत आहेत.

भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की, जेव्हा-जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म आणि पापाचे वर्चस्व होते, तेव्हा ते धर्म स्थापनेसाठी अवतार घेतील.

श्रीमद् भगवद पुराणातील बाराव्या स्कंदात असे लिहिले आहे की, भगवान कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या संधीकाळात घेतील. धर्मग्रंथानुसार भगवान राम आणि श्री कृष्ण यांचा देखील अवतार त्यांच्या संबंधित युगाच्या शेवटी झाला होता. म्हणूनच, कलियुगाचा अंत जवळ आल्यावर भगवान कल्कीचा जन्म होईल.

शास्त्रात कल्की अवतार संबंधित श्लोकाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की कलियुगात देवाचा कल्की अवतार केव्हा आणि कोठे असेल आणि त्याचे वडील कोण असतील?

सम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणास्यमहात्मन। भगवनविष्णुयशसः कल्कि प्रादुर्भाविष्यति।।

अर्थात, भगवान कल्की यांचा जन्म संभळ गावात विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रुपात होईल. देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दुष्टांचा नाश करतील, तेव्हाच सत्ययुग प्रारंभ होईल. भगवान विष्णूचा कल्की अवतार मिस्सकलंक अवतार म्हणूनही ओळखला जाईल. या अवतारात, त्यांच्या आईचे नाव सुमती असेल. याव्यतिरिक्त त्यांना तीन मोठे भाऊही असतील. ते सुमंत, प्राज्ञ आणि कवि म्हणून ओळखले जातील. यज्ञवल्क्य हे पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील. भगवान कल्की यांच्या लक्ष्मी रुपी पद्मा आणि वैष्णवी रुपी रमा अशा दोन पत्नी असतील. त्यांची मुले जय, विजय, मेघमाल आणि बलाहक असतील.

पुराणात असे सांगितले गेले आहे की, कलियुगाच्या शेवटी हे अवतार होतील आणि ते अधर्मींचा अंत करुन पुन्हा एकदा धर्माचे राज्य स्थापित करतील.

सध्या कलियुगाचा अजूनही थोडा वेळ बाकी आहे. त्यामुळे हा अवतार होण्यासाठी बराच वेळ आहे. आता आम्ही आणि आपण फक्त पृथ्वीच्या उन्नतीसाठी कल्की देव जन्माला येईल याची प्रतिक्षा करु शकतो.

When Will Lord Vishnu Take A Birth As Kalki Avtar Know Everything About It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या…

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.