Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या…

Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या...
Rishi

भारतीय ऋषी-मुनींनी या पृथ्वीवर धर्म, समाज, शहरं, ज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, (Who Are The Saptarshi) वास्तू, योग इत्यादींच्या ज्ञानाचा प्रसार केला होता.

Nupur Chilkulwar

|

Apr 09, 2021 | 4:02 PM

मुंबई : भारतीय ऋषी-मुनींनी या पृथ्वीवर धर्म, समाज, शहरं, ज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, (Who Are The Saptarshi) वास्तू, योग इत्यादींच्या ज्ञानाचा प्रसार केला होता. जगातील सर्व धर्म आणि विज्ञानातील प्रत्येक क्षेत्राला भारतीय ऋषींचे ऋणी असायला हवे. त्यांच्या योगदानाला नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. त्यांनी फक्त मनुष्यांचाच विचार केला नाही तर प्राणी, पक्षी, समुद्र, नदी, पर्वत आणि झाडे या सर्वांचा विचार केला आणि सर्वांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्य केले. चला, जाणून घ्या किती प्रकारचे ऋषी असतात ते (Do You Know Who Are The Saptarshi And What Are Their Meaning)-

ऋषींची संख्‍या सातच का असते?

रत्नकोषात सांगितल्याप्रमाणे –

।। सप्त ब्रह्मर्षि, देवर्षि, महर्षि, परमर्षय: । कण्डर्षिश्च, श्रुतर्षिश्च, राजर्षिश्च क्रमावश: ।।

अर्थात :

1. ब्रह्मर्षी

2. देवर्षी

3. महर्षी

4. परमर्षी

5. काण्डर्षी

6. श्रुतर्षी

7. राजर्षी

हे 7 प्रकारचे ऋषी असतात त्यामुळे यांना सप्तर्षी म्हटलं जातं. चला जाणून घेऊया यांचे अर्थ –

1. ब्रह्मर्षी : ज्याने ब्रह्माला (देवाला) ओळखलं तो ब्रह्मर्षी. दधीची, भारद्वाज, भृगू, वशिष्ठ सारख्या ऋषींना ब्रह्म ऋषी म्हटलं जातं.

2. देवर्षी : देवतांचे ऋषी किंवा ते देव जे ऋषी आहेत. नारद आणि कण्व सारख्या ऋषींना देवर्षी म्हटलं जातं.

3. महर्षी : महान ऋषी किंवा संत. अगस्त्य, वाल्मिकि किंवा वेद व्यास यांसारख्या ऋषींना महर्षी म्हटलं जातं.

4. परमर्षी : सर्वश्रेष्ठ श्रृषी. भेल यांसारख्या ऋषींना परमर्षी म्हटलं जातं.

5. काण्डर्षी : वेदाची एखादी शाखा, काण्ड किंवा विद्येची व्याख्या करणारा. जेमिनी सारख्या ऋषींना काण्डर्षी ऋषी म्हटलं जातं.

6. श्रुतर्षी : जे ऋषी श्रुती आणि स्मृती शास्त्रात पारंगत असेल. सुश्रुत सारख्या ऋषींना श्रुतर्षी म्हटलं जातं.

7. राजर्षी : राजाचा ऋषी किंवा तो राजा जो ऋषी बनला असेल. विश्वामित्र, राजा जनक आणि ऋतुपर्ण यांसारख्या ऋषींना राजर्षी म्हटलं जातं.

Do You Know Who Are The Saptarshi And What Are Their Meaning

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Masik Shivratri 2021 | चैत्र मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व…

Zodiac Signs | या चार राशीचे लोक असतात भाग्यवान, कमी वयात गाठतात यशाची शिखरं, बक्कळ पैसाही कमावतात

कृष्णाच्या यशोदा मातेला विष्णूचं खास वरदान, जाणून घ्या पौराणिक कथा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें