Matsya Jayanti 2021 | मत्स्य जयंती, भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार का घेतला? जाणून घ्या यामागील कहाणी…

हिंदू पंचांगानुसार मत्स्य जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी केली जाते (Matsya Jayanti). या दिवशी भगवान विष्णू पृथ्वीवर माशाच्या रुपात अवतरले होते.

Matsya Jayanti 2021 |  मत्स्य जयंती, भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार का घेतला? जाणून घ्या यामागील कहाणी...
matsya jayanti
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 1:12 PM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार मत्स्य जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी केली जाते (Matsya Jayanti). या दिवशी भगवान विष्णू पृथ्वीवर माशाच्या रुपात अवतरले होते. मत्स पुराणानुसार, पुष्पभद्र नदीकाठी भगवान विष्णूने जगाला आपत्तीपासून वाचवण्यासाठी मत्स्याचा अवतार घेतला होता. या दिवसाला मत्स्य जयंती म्हणून साजरं केलं जातं. विष्णूचे भक्त हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. याशिवाय या दिवशी विष्णू मंदिरात भव्य पूजेचे आयोजन करण्यात येते. मत्स्य रुप हे भगवान विष्णूच्या 10 प्रमुख अवतारांपैकी एक आहे ( Matsya Jayanti 2021 Know Why Lord Vishnu Take Matsya Avtar).

मत्स जयंती शुभ मुहूर्त

मत्स जयंती तिथी – 15 एप्रिल 2021

मत्स जयंतीला काय करावं?

या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी मत्स्य पुराण ऐकून आणि वाचल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. मत्स्य जयंतीच्या दिवशी माशांना पीठाचे गोळे खाऊ घातल्याने पूण्य प्राप्त होते. या दिवशी माशांना नदी किंवा समुद्रात सोडल्याने भगवान विष्णू हे प्रसन्न होतात.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार द्रविड देशातील राजर्षी सत्यव्रत कृतमाला हे नदीत स्नान करत होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या हातात पाणी घेतले तेव्हा त्यांच्या हातात लहान मासा आला. राजाने ते मासे नदीत सोडले. तेव्हा मासे म्हणाले की राजन नदीत मोठे प्राणी लहान प्राण्यांना खातात. तू माझ्या जीवाचे रक्षण कर. हे ऐकून राजाने आपल्या कमांडलमध्ये माशाला ठेवले. पण एकाच रात्रीत तो मासा इतका मोठा झाला की कमंडल लहान पडू लागलं.

मग राजाने माशाला एका माठात ठेवलं जेणेकरुन ते सुरक्षित राहील. पण, पुन्हा एका रात्रीत हा मासा इतका मोठा झाला की माठ लहान पडू लागला. राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने या माशाला तलावात ठेवले. पण, एका रात्रीत माशाचे शरीर इतके मोठे झाले की तलावही लहान होऊ लागला. हे पाहून राजाला समजले की हा मासा काही साधारण मासा नाही.

भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार का घेतला?

राजा म्हणाला, तू नक्कीच एक महान आत्मा आहेस हे मला समजले आहे. जर हे सत्य असेल तर मग आपण मत्स्याचे रुप का घेतले आहे? तेव्हा भगवान विष्णू राजाला दर्शन देऊन म्हणाले, हे राजन हयाग्रीव नावाच्या राक्षसाने वेद ग्रंथ चोरला आहे. ज्यामुळे जगभर अज्ञान आणि अधर्म पसरला आहे. मी त्याचा अंत करण्यासाठी हे मत्स्य रुप घेतलं आहे. आजपासून सात दिवसानंतर पृथ्वी महापुरात बुडेल. तोपर्यंत आपण एक नाव बनवा. या नावेत सुक्ष्म जीवांपासून ते सप्तर्षिपर्यंत सर्वांना घेऊन चढा.

जेव्हा तुमची नाव हलेल तेव्हा मी तुमच्या सर्वांना वाचवण्यासाठी येईल. आपण नाव माझ्या सिंहाला बांधा आणि मी प्रलयाच्या शेवटपर्यंत मी आपली नाव ओढत राहील. भगवान विष्णूने ही नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली. त्या शिखराला नौकाबंध असं म्हणतात. प्रलय संपल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि वेद ग्रंथ ब्रह्माच्या स्वाधीन केले. राजर्षि सत्यव्रतांना वेदांचे ज्ञान दिले आणि त्या नावेच जे जीव वाचले होते त्यांच्यापासूनच विुश्वाला पुन्हा चालवण्यत आले.

Matsya Jayanti 2021 Know Why Lord Vishnu Take Matsya Avtar

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.