महाभारताच्या युद्धात भगदत्त अर्जुनला का मारणार होता? जाणून घ्या ही पौराणिक कहाणी…

महाभारताच्या युद्धात भगदत्त अर्जुनला का मारणार होता? जाणून घ्या ही पौराणिक कहाणी...
Bhagdatta-Lord-Krishna

महाभारताच्या युद्धाच्या अनेक कथा आणि पराक्रमी पात्रांपैकी काही ( Mahabharata War) असे पात्र देखील आहेत ज्यांचं स्मरण कधी केलं जातं नाही.

Nupur Chilkulwar

|

Apr 13, 2021 | 2:00 PM

मुंबई : महाभारताच्या युद्धाच्या अनेक कथा आणि पराक्रमी पात्रांपैकी काही ( Mahabharata War) असे पात्र देखील आहेत ज्यांचं स्मरण कधी केलं जातं नाही. त्यांचा उल्लेख महाभारताच्या कथेमध्येही मिळतो कारण बहुतेक कथा या फक्त महान आणि प्रसिद्ध चरित्रांचं वर्णन करण्यात आलं आहे. अशाच एका न ऐकलेल नाव म्हणजे भगदत्त, जो प्रागज्योतिषपुरच्या राजा नरकासूराचा पुत्र होता. भगदत्त यांचा उल्लेख महाभारतात मिळतो. भगदत्त एकमात्र अशी व्यक्ती होता आठ दिवसांपर्यंत एकट्याने अर्जुनसोबत युद्ध केलं (Why Bhagadatta Want To Kill Arjuna In The Mahabharata War).

युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञावेळी जेव्हा अर्जुन राज्यांना आपल्या अधीन करत होते आणि भगदत्तसोबतच युद्ध आठ दिवसांपर्यंत चाललं. अर्जुनने अनेक प्रयत्न केले परंतु प्रागज्योतिषपुरवर विजय प्राप्त करु शकला नाही. भगदत्त आणि अर्जुनचे पिता इंद्र हे घनिष्ठ मित्र होते. म्हणून यांनी यांना यज्ञासाठी शुभकामना दिल्या. एकदा भगदत्ताचं युद्ध कर्णसोबतही झालं होतं ज्यामध्ये कर्णाचा विजय झाला होता. कारण, भगदत्तला कर्णाने पराजित केलं होतं. त्यामुळे भगदत्तने महाभारताचं युद्ध कौरवांकडून लढावं लागलं होतं. कर्णाने सर्व दिशांच्या राजांना आपल्या बाजुने घेतलं होतं. याचा उल्लेख महाभारताच्या उद्योग पर्वाच्या 164 व्या अध्यायात मिळाला.

भगदत्तने अनेकांना पराजित केलं

महाभारतावेळी भगदत्ताचं वय खूप जास्त होतं आणि या योद्ध्याने भीम, अभिमन्यु आणि सार्तिके सारख्या योद्धांना पराजित केलं होतं. द्रोण पर्वाच्या चोवीसाव्या अध्यायात याचं वर्णन मिळतं. तसेच, अभिमन्यु आणि इतर अनेक योद्धांसोबत एकावेळी भगदत्तावर आक्रमण केलं होतं. परंतु भगदत्तसमोर पराजय स्विकार केली.

द्रोण पर्वाच्या सत्तावीसाव्या अध्यायात उल्लेख केला गेला आहे की कुरुक्षेत्राच्या युद्धात बाराव्या दिवशी भगदत्तचा सामना अर्जुनसोबत झाला. दोघांमध्ये भयंकर संग्राम झाला. एकवेळ अशी आली जेव्हा भगदत्ताने आपल्या हत्तीने अर्जुनला मारणारच होता पण, भगवान कृष्णाने अर्जुनला वाचवलं. त्यानंतर पुन्हा भगदत्तासमोर आला तेव्हा अर्जुनने भगदत्ताच्या अनेक अस्त्रांना विफल केलं आणि तेव्हा भगदत्ताने वैष्णो अस्त्र प्रक्षेपण केलं, ज्याला पार करणे अर्जुनसाठी संभव नव्हतं. जेव्हापर्यंत वैष्णो अस्त्र अर्जुनला लागेल तोपर्यंत भगवान श्री कृष्ण मधे आले आणि त्यांच्यासमोर हे अस्त्र विफल ठरले. या प्रकारे भगवान कृष्णाने पुन्हा एकदा भगदत्तापासून अर्जुनला वाचवलं.

गजराजने जमिनीत दात गाडले

तेव्हा भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला म्हटलं की त्याने आता भगदत्तावर प्रहार करुन त्याचा अंत करावा. त्यानंतर सर्वात पहिले अर्जुनने भगदत्ताच्या सुप्रतीक नावाच्या पराक्रमी हत्ती नाराचवर प्रहार केला. हा प्रहार इतका तीव्र होता की बाण हठीच्या कुंभ स्थळावर पंखासोबत प्रवेश केला तेव्हा गजराजने लगेच आपले दात जमिनीत गाडले.

त्यानंतर भगवान कृष्णाने अर्जुनाला म्हटलं की भगदत्ताची आयु इतकी जास्त आहे की चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे त्याच्या पापण्या नेहमी खाली असतात आणि त्याचे डोळे नेहमी बंद असतात कारण, भगदत्त अतिशय पराक्रमी आणि शूरवीर आहे. त्यामुळे त्याने आपल्या डोळे उघडे राहावे म्हणून कपाळावर पट्टी बांधली आहे.

हे ऐकून अर्जुनने सर्वात आधी पहिले भगदत्ताच्या मस्तकवर बांधलेल्या पट्टीवर तीर मारला त्याचा परिणाम म्हणून ती पट्टी क्षीण झाली आणि त्याचे डोळे बंद झाले. भगदत्ताच्या डोळ्यांसमोर अंधार झाला आणि संधी साधून अर्जुनने भगदत्ताचा वध केला. वास्तवमध्ये भगदत्त इतका पराक्रमी होता पण त्याच्यासाठी अर्जुनाला पराजित करणे असंभव होतं कारण अर्जुनच्या पक्षात स्वत: भगवान कृष्ण होते.

Why Bhagadatta Want To Kill Arjuna In The Mahabharata War

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या…

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें