
मुंबई : भगवान शिव आणि माता गौरीलाही श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे श्रावणात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रत (Mangla Gouri Vrat) पाळण्यात येते. आज श्रावणातला मंगळवार असल्याने हे व्रत पाळले जात आहे. मंगळा गौरीचे व्रत विवाहित स्त्रिया तसेच अविवाहित मुली देखील करतात. असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने पत्रिकेतील मंगळ दोष दूर होतो आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतात. दुसरीकडे विवाहित स्त्रीने हे व्रत पाळल्यास वैवाहिक जीवन सुखी होते, तसेच संतानसुखही प्राप्त होते. परंतु जोपर्यंत मंगळा गौरी व्रताचे उद्यापन होत नाही तोपर्यंत हे व्रत अपूर्ण मानले जाते. हे व्रत कशा प्रकारे केले जाते त्याबद्दल जाणून घेऊया.
मंगळा गौरी व्रत हे श्रावण महिन्यात पाळले जाते. त्यामुळे त्याचे उद्यापनही केवळ श्रावण महिन्यातच करावे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात तुम्ही त्याचे उद्यापन करू शकता. 16 मंगळा गौरी व्रत पाळल्यानंतर, तुम्ही 17 किंवा 20 मंगळा गौरी व्रत 21 श्रावण शुक्ल पक्ष मंगळवारी उदयापन करू शकता. म्हणजेच चार वर्षे श्रापण महिन्यातील 16 किंवा 20 मंगळवारी उपवास केल्यानंतर, व्रताचे उद्यापनही श्रावण शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारी करता येते.
मंगळा गौरीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. उद्यापनाच्या दिवशीही उपवास ठेवा आणि नवरा बायको दोघांनीही पूजा करा. लाकडी चौरंग मांडा आणि त्याभोवती केळीची पाने बांधा. आता कलशाची स्थापना करा आणि मंगला गौरीची मूर्ती कलशावर स्थापित करा. नेहमीप्रमाणे सौभाग्याचे साहित्य, वस्त्र, बांगड्या वगैरे अर्पण करून देवीची पूजा करावी आणि मंगळा गौरीची व्रत कथा ऐकावी. पूजेच्या वेळी गणेशाचे स्मरण करून ‘श्रीमंगलागौरायै नमः’ या मंत्राचा जप करा आणि शेवटी सोळा दिव्यांनी आरती करा.
उद्यापनाची पूजा आटोपल्यानंतर पुजारी व सोळा विवाहित महिलांना भोजन द्यावे. जेव्हा शेवटचे मंगळा गौरी व्रत श्रावणामध्ये येते तेव्हा या दिवशी आपल्या पतीसोबत हवन करा. पूजेमध्ये कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना आमंत्रित करा. पूजेनंतर ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मंगळा गौरी व्रत तुम्ही पुजाऱ्याकडूनही करून घेऊ शकता. अशाप्रकारे मंगळा गौरी व्रताचे योग्य व पद्धतशीर उद्यापन केल्याने विवाहित महिलांना सुख-समृद्धी प्राप्त होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)