AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangla gaouri 2022: आज पहिले मंगळागौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी

विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात.  एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होतात.

Mangla gaouri 2022: आज पहिले मंगळागौरी व्रत, महत्त्व आणि पूजा विधी
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 02, 2022 | 9:53 AM
Share

श्रावण महिना (Shravan 2022) हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिना (sawan 2022) 29 जुलैला सुरु झाला आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. शिव भक्त दर सोमवारी श्रावण सोमवार व्रत पाळतात तर महिला दर मंगळवारी मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) करातात. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान महादेवाला मिळविण्यासाठी असंख्य उपवास केले होते आणि त्यापैकी एक म्हणजे मंगळा गौरी व्रत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात.  एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होतात. जर भक्ताची अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत केल्याने त्याची मनोकामनाही पूर्ण होते. यासोबतच उपवास करणाऱ्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. यंदा श्रावण महिन्यातले पहिले मंगळा गौरी व्रत 2 ऑगस्ट आणि शेवटचे मंगळा गौरी व्रत 23 ऑगस्टला असेल. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी भगवान शिव आणि पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

मंगला गौरी व्रत म्हणजे काय?

मंगळा गौरी व्रत देवी पार्वती म्हणजेच गौरीच्या पूजेला समर्पित आहे. मंगला गौरी व्रत घरातील समृद्धी, उत्तम आरोग्य आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. श्रावण  महिन्यात सोमवारचा उपवास भगवान शिवाला समर्पित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळा गौरीचा उपवास महादेवाची अर्धांगिनी माता पार्वतीला समर्पित केला जातो.

मंगला गौरी व्रताची तिथी

श्रावण महिना यावेळी 29 जुलैपासून सुरू झाला असून तो 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.  या श्रावणमध्ये चार मंगळवार आहेत. पहिले मंगळा गौरी व्रत – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार दुसरे मंगळा गौरी व्रत – 9 ऑगस्ट 2022, मंगळवार तिसरे मंगला गौरी व्रत – 16 ऑगस्ट 2022, मंगळवार चौथे मंगला गौरी व्रत – 23 ऑगस्ट 2022, मंगळवार

मंगळा गौरी व्रताची पूजा पद्धत

  1. मंगळवारी सकाळी लवकर उठून व्रताचा  संकल्प करावा.
  2. स्नान वगैरे झाल्यावर देव घरासमोर मंगला गौरी मातेचे व्रत करावे.
  3. यानंतर माता मंगला गौरी म्हणजेच पार्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
  4. मूर्तीला लाल वस्त्र परिधान करावे.
  5. यानंतर तुपाने भरलेला पिठाचा दिवा लावून आरती करावी.
  6. यानंतर ओम उमामहेश्वराय नमः या मंत्राचा जप करा.
  7. मातेला फुले, लाडू, फळे, सुपारी, वेलची, लवंग, सुपारी, मध आणि पेठे अर्पण करा.
  8. यानंतर मंगला गौरीची कथा ऐका.
  9. पूजेनंतर घरच्यांना प्रसाद वाटप करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार