Shrawan 2022: श्रावण सोमवारी अशा पद्धतीने करा महादेवाची पूजा, जाणून घ्या श्रावण सोमवारच्या तारखा

14 जुलै 2022 पासून हिंदी भाषिकांचा श्रावण महिना (Shrawan 2022) सुरू झाला आहे.  12 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असेल. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास (Shrawan somwar puja) करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात, केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या […]

Shrawan 2022: श्रावण सोमवारी अशा पद्धतीने करा महादेवाची पूजा, जाणून घ्या श्रावण सोमवारच्या तारखा
आज पहिला श्रावण सोमवार
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 5:20 AM

14 जुलै 2022 पासून हिंदी भाषिकांचा श्रावण महिना (Shrawan 2022) सुरू झाला आहे.  12 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असेल. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास (Shrawan somwar puja) करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात, केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल, ते सविस्तर जाणून घेऊया. भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात, दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात.

श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं  नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी.

श्रावण महिन्यात देवी सतीने दुस-या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली,  श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर अवश्य करायला हवा. असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.

हे सुद्धा वाचा

इच्छित फळ मिळविण्यासाठी अशा प्रकारे करा महादेवाची पूजा

  1. श्रावण महिन्यात धनाच्या इच्छेने शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्र चंदनाने पूजा करावी. शिवपूजेचा हा उपाय केल्याने महादेवासह माता लक्ष्मीच्या आशिर्वादाचाही वर्षाव होतो.
  2. कोणत्याही विशिष्ट कार्यातील अडथळे दूर करून त्यात अपेक्षित यश मिळवण्यासाठी महादेवाच्या भक्तांनी पारद शिवलिंगाची संपूर्ण श्रावण महिनाभर पूजा करावी.
  3. लग्नानंतर बराच काळ लोटूनही ज्यांना संतानसुख मिळू शकले नाही, त्यांनी श्रावण महिन्यात लोणीचे शिवलिंग बनवून गंगाजलाने अभिषेक करावा. असे मानले जाते की, शिवपूजेशी संबंधित हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास इच्छुकांना लवकरच संतानसुख प्राप्त होते.
  4. जर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या वास्तूचे सुख मिळाले नसेल किंवा तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात  मधाने शिवलिंगाची विशेष पूजा करावी.

या तारखांना येईल श्रावण सोमवार

  1. पहिला श्रावण सोमवार व्रत – 18 जुलै 2022
  2. दुसरा श्रावण सोमवार व्रत – 25 जुलै 2022
  3. तिसरा श्रावण सोमवार व्रत – 01 ऑगस्ट 2022
  4. चौथा श्रावण सोमवार व्रत – 08 ऑगस्ट 2022
  5. पाचवा श्रावण सोमवार व्रत – 12 ऑगस्ट 2022

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.