AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 मार्चपासून शुक्र ग्रह बदलणार रास आणि नक्षत्र, हे परिवर्तन ‘या’ लोकांचे नशीब चमकवणार

ज्योतिषशास्त्रानुसार 26 मार्च 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडणार आहे. या दिवशी शुक्र ग्रह रास बदलण्याबरोबरच नक्षत्रही बदलणार आहे. तर चला जाणून घेऊया की या दुहेरी शुक्र परिवर्तनाची वेळ कोणती आहे आणि कोणत्या राशींना हा सुवर्णकाळ लाभेल.

26 मार्चपासून शुक्र ग्रह बदलणार रास आणि नक्षत्र, हे परिवर्तन 'या' लोकांचे नशीब चमकवणार
shukra gochar 2026
| Edited By: | Updated on: Mar 24, 2026 | 10:23 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीचा घटक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, ती व्यक्ती भौतिक सुखसोयी, आकर्षण आणि समृद्धीचा आनंद घेते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रह मार्ग बदलतो, तेव्हा त्याचे परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो. तर यंदा 26 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी शुक्र केवळ रास बदल्यावर त्यांचे नक्षत्रही बदलणार आहे. तर शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल आणि 19 एप्रिलपर्यंत याच राशीत गोचर करेल. हा दुर्मिळ योगायोग या काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया की या गोचरानंतर कोणत्या भाग्यवान राशींचे भाग्य उजळून निघेल.

शुक्र परिवर्तन 2026 : वेळा आणि दुर्मिळ योगायोग

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 26 मार्च 2026 रोजी पहाटे 5 वाजून 13 मिनिटांनी शुक्र ग्रह आपली भ्रमण प्रक्रिया सुरू करेल . तर या परिवर्तना दरम्यान शुक्र ग्रह रास आणि नक्षत्रांमध्ये एकाच वेळी बदलणार आहे. रामनवमीला होणारा हा शुभ योग अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि धन घेऊन येईल.

या 5 राशींचे नशीब बदलेल

शुभ-अशुभ चिन्हे आणि ग्रहस्थितीच्या गणनेनुसार या राशींच्या लोकांना शुक्राच्या या परिवर्तनामुळे सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मेष रास

हा परिवर्तनाचा दिवस मेष राशीसाठी आर्थिक समृद्धी घेऊन येईल. तसेच या राशींच्या लोकांचे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रेमसंबंध अधिक गोड होतील.

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने हा बदल तुमच्यासाठी वरदान आहे. या राशींची लोकं सुख-सुविधांवर खर्च करतील, पण उत्पन्नाचे नवीन स्रोतही खुले होतील. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह रास असलेल्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या ग्रहस्थितीमुळे व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. तसेच या राशींच्या लोकांची निर्णयक्षमता सुधारेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल.

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात विकास होईल. तसेच गुंतवणुकीची योजना आखत असाल तर ही एक चांगली वेळ आहे. कौटुंबिक जीवन सुखकर राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

मीन रास

हे शुक्र संक्रमण मीन राशीसाठी भाग्यवर्धक ठरेल. परदेश प्रवासाची शक्यता असून धार्मिक कार्यांमधील आवड वाढेल. तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे.

2026 च्या शुक्र संक्रमणाचे महत्त्व

शुक्राचे हे संक्रमण विशेष मानले जाते, कारण रास आणि नक्षत्रात एकाच वेळी होणारा बदल दुर्मिळ असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या बदलाचा प्रेमसंबंध, करिअर, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जीवनावर खोलवर परिणाम होतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत